शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटी वृक्ष लागवडीत रेशीम विभागाला प्राधान्य दिल्याने वनविभागच 'साइड ट्रॅक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:57 IST

Amravati : जिवंत झाडे तेवढी ऑनलाइन, हजारो मृत रोपांचे खड्डेही उरले नाहीत

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात राज्यात १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यातील चार कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य रेशीम विभागाला दिले असून पारंपरिकपणे वृक्षलागवडीशी संबंधित असलेल्या वन विभागाला 'साईड ट्रॅक' करण्यात आले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात ३३ टक्के वृक्ष आच्छादन गाठण्यासाठी किमान १५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. राष्ट्रीय वनधोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के भूभाग वृक्ष आच्छादित असणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याचे वनक्षेत्र केवळ २१.२५ टक्के असून, हे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर समाधानकारक मानले जात नाही. गत तीन वर्षापासून अभिसरण योजनेमुळे वृक्ष लागवड ही हजारोंच्या आत सीमित झाली आहे. वनक्षेत्र वाढविण्यात वन विभाग कमालीचा माघारला आहे. ग्रामपंचायत स्तरावर लागवड करण्यात आलेल्या हजारो रोपांपैकी मोठ्या प्रमाणात रोपे मृतप्राय झाली आहेत. जिवंत रोपांचा आकडा केवळ ऑनलाईन दिसत आहे. याचे मूल्यांकन होणे तेवढेच गरज व्यक्त केली जात आहे.

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्रमहसूल व वन विभागाने ११ जून रोजी काढलेल्या 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात १० कोटी वृक्ष लागवड राबविण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करावी लागणार आहे. अद्यापपर्यंत कुठेही खड्डे खोदले नाही. त्यामुळे रोपे केव्हा लावणार हा सवाल आहे. गेल्या १० वर्षात केवळ ३.२५ टक्के वृक्ष आच्छादन वाढले, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

असे आहे विभागनिहाय वृक्षलागवडीचे टार्गेट१० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या २५ विभागाला वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यात रेशीम विभाग ४ कोटी, वन विभाग २ कोटी, ग्राम विकास १ कोटी, नगर विकास १ कोटी, शालेय शिक्षण २० लाख, सार्वजनिक बांधकाम १५ लाख, जलसंपदा ५ लाख, महसूल ५ लाख, उद्योग विभाग ५ लाख, गृह विभाग ५ लाख, उच्च व तंत्र शिक्षण ५ लाख, मृद व जलसंधारण ५ लाख, सहकार व पणन ५ लाख, आरोग्य विभाग ३ लाख, ऊर्जा विभाग ३ लाख, आदिवासी विकास ३ लाख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास २ लाख, महिला व बालकल्याण २ लाख, वैद्यकीय शिक्षण २ लाख, पर्यटन विकास २ लाख, राज्य रस्ते विकास महामंडळ २० लाख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण २० लाख, रेल्वे २० लाख, संरक्षण विभाग ५० लाख यासह 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत ५० लाख अशी एकूण १० कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती