इर्विनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:38 AM2018-08-21T01:38:22+5:302018-08-21T01:38:50+5:30

किरकोळ वादातून एका तरुणाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे इर्विन परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

Irwin cleaned up the sword with a sword | इर्विनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला

इर्विनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : किरकोळ वादातून एका तरुणाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे इर्विन परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सिध्दांत रंगराज पळसपगार (२०,रा. योगायोग कॉलनी) असे कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बलराज प्रकाश मारवे (४०,रा. टीबी हॉस्टीटलमागील क्वार्टर परिसर) जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी पदावर कार्यरत आहे. बलराज मारवे यांची सोमवारी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत ड्युटी होती. दरम्यान सायंकाळी वार्ड क्रमांक ८ समोर बलराज उभे असताना अचानक आरोपी सिंध्दात पळसपगार हा तलवार हाती घेऊन बलराजच्या अंगावर धावून गेला. बलराज यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या हातावर व खाद्यावर तलवारीचे धाव बसले. सुदैवाने ती तलवार बोथट असल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्याच्या हातावर दोन ठिकाणी तलवारीने जखमा झाल्या. या झटापटीनंतर रुग्णालयात परिसरात प्रचंड गर्दी झाली. पेट्रोलिंगवर असलेले पोलीस कर्मचारी विजय बाहेनकर व शांताराम नन्नावरे यांनी आरोपीला पकडले. घटनेच्या माहितीवरून कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड व पोलीस कर्मचारी रुपेश खुरकटे यांनी तत्काळ इर्विन रुग्णालय गाठले. त्यावेळी आरोपी तलवार घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी आरोपी सिध्दांतला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. या घटनेची तक्रार बलराज मारवे यांनी कोतवाली पोलीसात नोंदविली.

Web Title: Irwin cleaned up the sword with a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.