परिसरात चौकशी : राज्यभरातील घटनेमुळे पोलीस दक्षपरतवाडा : राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या मुलीवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमुळे सर्वत्र जनाक्रोश पाहता, धामणगाव गढी परिसराताच्या प्रकाश तलाव परिसरात बुधवारी दुसऱ्याही दिवशी पोलिसांनी खबरदारी घेत चौकशी सुरू ठेवली. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता धामणगाव गढी येथील दोन युवकांना चिखलदा मार्गावरील प्रकाश तलाव परिसरातील जंगलात युवतीचे कपडे विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सदरची माहिती त्यांनी परतवाडा पोलिसाना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता मंगळवारपासून परिसर पिंजून काढला. तर तलावात गोताखोरांच्या सहाय्याने गळ टाकला. मात्र काहीच हाती लागले नाही. दुसऱ्या दिवशी शोधपरतवाडा पोलिसांनी बुधवारी परिसरातील मनभंग, भिलखेडा, आडनदी, धामणगाव गढी, सही आदी गावांमध्ये जाऊन चौकशी केली. मात्र काहीच सापडले नाही. किंवा मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आली नाही. त्या घटनांचा धसकाअहमदनगर जिल्ह्यात झालेली अत्याचार प्रकरण थेट विधानसभेत गाजल्याने त्याचा धसका राज्यातील पोलीस विभााने घेतला आहे. त्याच धर्तीवर सदर घटनेत कुठल्याच प्रकारची कुचराई राहू नये, यसाठी परतवाडा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा तपास सुरू ठेवला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी या घटनेचा तपास अतिशय बारकाईने करीत आहेत. याचे अद्याप तरी धागेदोेरे लागले नाहीत. (प्रतिनिधी)तो खोडसाडपणा ?चिखलदरा पर्यटन स्थळावर शाळा, महाविद्यालयीन मुली आपल्या मित्रांसमवेत दुचाकीने तोंडाला स्कार्फ बांधून येतात. त्यातच जंगलातील पायवाटा पाहता नको ते कृत्य सुधा आटोपत असल्याचे चित्र आहे. अशातूनच हा प्रकार झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. तर दुसरीकडे परिसरातील दऱ्याखोऱ्यात सुद्धा शोध घेतला जात आहे.
‘त्या’ युवतीचा तपास गुलदस्त्यात
By admin | Updated: July 20, 2016 23:57 IST