शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध विद्युत जोडणी जिवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:38 IST

रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्युत प्रवाह घेण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

ठळक मुद्देहिरदामल येथील घटना : टेम्ब्रूसोंडा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा घरी मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्युत प्रवाह घेण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.दुर्गा गजानन जामकर (१७) असे मृताचे नाव आहे. १४ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुट्टी घेऊन ती घरी आली होती. सायंकाळी घराकडून गेलेल्या विद्युत खांबावरील जिवंत विद्युत तारांमध्ये आकोडे टाकून घरात नेहमीप्रमाणे वीरपुरवठा घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यात तिला जोराचा धक्का लागल्याने ती कोसळली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आला.१५ आॅगस्ट रोजी दुपारी तीन वाजता तिच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार लिल्हारे, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आर.जी. काळे, अधीक्षक पी.डब्ल्यू. देसाई, शिक्षक वाय.एस. गणोरकर, डी.व्ही. देशमुख यांच्यासह गावकरी उपस्थित होते.दरम्यान, मेंदी सुकविण्यसाठी कूलर लावत असताना तिचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.महावितरणचे कर्मचारी बेपत्तामेळघाटात खांबावरून घरोघरी वीजप्रवाह घेतला जात असल्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. या आदिवासी खेड्यांमधून महावितरणचे कर्मचारी हप्ताखोरी करीत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुढे आली आहे. यामुळेच बिनबोभाट आकोडे टाकून घरोघरी वीजपुरवठा घेत्ला जातो. त्याचा फटका एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतला. हे सर्व अवैध कनेक्शन काढण्याचे आदेश महावितरणला प्रकल्प कार्यालयाने दिले. दुसरीकडे सदर विद्यार्थिनीला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापकाने सुटी कशी दिली, असा सवाल गावकऱ्यांसह पालक वर्गाने केला आहे.आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे मृत्यूअचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या दत्तप्रभू अनुदानित आश्रमशाळेत गत आठवड्यात इयत्ता सातवीत शिकणाºया शिशुपाल बेलसरे या विद्याथ्यार्चा मृत्यू झाला. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना या आश्रमशाळेत सुविधा न देता लाखोंचे अनुदान लाटत असल्याचा प्रकार चौकशीत पुढे आला. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू