या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतपर भाषण विजय टोम्पे यांनी केले आणि उद्घाटनीय कार्यक्रमाच्या मुख्य वक्ता खासदार नवनीत राणा होत्या. प्रथम सत्राच्या प्रथम प्रमुख वक्ता पुण्यकोटी गणेशाई वीणा, नेदरलँड व द्वितीय वक्ता विलास गुल्हाने, बहरैन, तर द्वितीय सत्राचे प्रथम वक्ता मेघा सोनावणे, लंडन आणि द्वितीय वक्ता स्नेहा पडगिलवार लंडन यांनी प्रामुख्याने या परिषदेत मार्गदर्शन केलेत. संपूर्ण परिषदेचे संचालन प्रिया देवळे व निधी दीक्षित यांनी केले.
कुलगुरू सुभाष चौधरी यांनी महाविद्यालयाच्या महिला समितीद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे कौतुक करत अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चर्चासत्रामुळे नवीन संशोधनाला चालना मिळते, असे उद्गार काढत महाविद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. विलास गुल्हाने यांनी 'स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाबाबत महिलांचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना महिला जबाबदारीने स्वत:चे रक्षण करून कुटुंबाचे स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करू शकतात. तसेच त्यांच्या जागरुकतेमुळे जवळपास ९९ टक्के आपत्ती घडतच नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: सेफ्टी ऑफिसर बनायला पाहिजे, असे आवाहन केले.
------