गजानन मोहोड / अमरावती : सततची नापिकी, अवकाळी पाऊस अन् गारपिटीसारख्या संकटांचा सामना करीत असताना डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आणि याच वैफल्यातून मृत्यूला कवटाळणाऱ्या नऊ शेतकरी कुटुंबीयांशी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी जिव्हाळ्याने संवाद साधला. बळीराजाच्या आभाळभर दु:खावर मायेची फुंकर घातली. त्यांना जगण्याचे बळ दिले. या चक्रव्यूहातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी संसदेत रान पेटविण्याची आश्वासक ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांशी साधला संवाद : झंझावाती पदयात्रा, अभूतपूर्व प्रतिसाद
By admin | Updated: May 1, 2015 00:32 IST