शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य सागवान तस्करी; आरोपीच्या शोधार्थ मध्य प्रदेशचे वन अधिकारी परतवाड्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:17 IST

वन अधिकाऱ्यांची धावपळ

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : ‘आंतरराज्य सागवान तस्करीत सब गोलमाल है’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी सकाळी ८ पासूनच वन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. अवघ्या आठ तासांतच आरोपींच्या शोधार्थ मध्य प्रदेशचे वनाधिकारी आपल्या ताफ्यासह परतवाड्यात दाखल झाले आहेत.

मध्य प्रदेश जंगलातील सागवान लाकडाची अवैध कटाई करून तस्करी करणारे वाहन परतवाडा वनपरिक्षेत्रातील वडुरा येथे १९ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

मध्य प्रदेशातील सावलमेंढा वन परिक्षेत्रांतर्गत २० नोव्हेंबरला या अनुषंगाने वनगुन्हा दाखल केला गेला. यात परतवाड्यातील संशयित आरोपींची नावे त्यांना मिळाली. पण मागील २५ दिवसांत मध्य प्रदेश वन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची साधी चौकशीही केलेली नव्हती.

नोटीस बजावणार

‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करताच मध्य प्रदेश वनाधिकारी आपल्या ताफ्यासह परतवाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले. आरोपींबाबत त्यांनी माहिती घेतली. या आरोपींवर ते आता नोटीस बजावणार आहेत.

मध्य प्रदेश वन विभाग गंभीर नाही

सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना १९ नोव्हेंबरला मध्य प्रदेश वन विभागाचा कर्मचारी अपघातग्रस्त झाला. यात तो मृत्यूच्या दाढेतून परतला; पण याची फारशी दखल मध्य प्रदेश वन विभागाने घेतल्याचे दिसून येत नाही. वन तस्करांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलेले नाही.

२५ दिवसांत दुसऱ्यांदा तस्करी

मध्य प्रदेश वन क्षेत्रातून सागवान लाकडाची अवैध वृक्षतोड करून महाराष्ट्रात तस्करी होण्याचा अवघ्या २५ दिवसांत दुसरा प्रसंग उजेडात आला आहे; पण ते वाहन त्यांना मिळालेच नाही.

टॅग्स :forest departmentवनविभागSmugglingतस्करीMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशAmravatiअमरावती