शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

खरिपाला विम्याचे कवच

By admin | Updated: June 28, 2017 00:24 IST

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, ...

पंतप्रधान पीक विमा योजना : कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी यंदाच्या खरिपातील नऊ पिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेचे संरक्षण कवच मिळणार आहे. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक, तर गैरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही "डेडलाईन" देण्यात आली आहे.जिल्ह्यातील भात, ज्वारी, भुईमूग, सोयबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस यापिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अन्नधान्य व गळीतासाठी विमासंरक्षित रक्कमेच्या दोन टक्के किंवा वास्तवदर्शीपेक्षा कमी असेल तसेच कापसासाठी विमासंरक्षित दराच्या पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. योजनेत निश्चित केलेला विम्याचा वाटा व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हिस्सा यामधील फरकाला विमा अनुदान समजून केंद्र व राज्यशासन समप्रमाणात वाटा देणार आहे. पीकउत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी जिल्हास्तरावर २४, तालुकास्तरावर १६ व मंडळस्तरावर किमान १० पीककापणी प्रयोग घेण्यात येतील. उत्पन्नाचे अंदाज अचूक कालमर्यादेत प्राप्त करण्यासाठी उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या सहायाने पीककापणी प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे.यासाठी रिमोट सेंसिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन इत्यादींचा वापर करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, पीककापणी प्रयोगासाठी केंद्र शासनाद्वारे विकसित मोबाईल अ‍ॅपचा वापर बंधनकारक आहे. योजनेत पीकपेरणी ते काढणीपर्यंतच्या शेतकऱ्यांना टाळता न येणाऱ्या कारणांसाठी पीकविम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत कळवावी माहिती शेतकऱ्यांनी घटना घडल्याच्या ४८ तासांच्या आत याबाबतची माहिती विमा कंपनी, संबंधित बँका, कृषी व महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकावर द्यावी.भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी अर्ज, पिकांची नोंद असलेला ७-१२, विमा हप्ता भरल्याचा पुरावा आदी माहिती सात दिवसांच्या आत कळविणे अनिवार्य आहे.मोबाईल अ‍ॅपद्वारे स्थानिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र त्याच्या अक्षांश, रेखांशासहित दिले जाऊ शकते.शेतकऱ्यांनी त्यांचा फोटो असलेली बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधार कार्डाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड नसल्यास आधारनोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉब कार्ड, वाहनपरवाना यापैकी एक.