शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीला गालबोट, पदवीधरच्या अपक्ष उमेदवाराची गाडी थांबवून प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:50 IST

अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीचे अपक्ष उमेदवार विकेश गवालेवर हे अमरावतीवरून मोर्शीकडे प्रचारासाठी जात होते.

अमरावती - राज्यातील ५ विभागात पदवीधऱ मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीचा प्रचार आता सुरू झाला आहे. उमेदवारांचे अर्ज निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या नेत्यांना घेऊन प्रचारात गुंतले आहेत. तर, अपक्ष उमेदवार स्वत:ची ताकद आजमावत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्षांमध्येच निवडणूक होत असून इतरही मतदारसंघात अपक्षांनी आव्हान दिलं आहे. अपक्ष उमेदवारांन दाबण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यातच, अमरावती पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने या निवडणुकीला गालबोट लागलं आहे. 

अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीचे अपक्ष उमेदवार विकेश गवालेवर हे अमरावतीवरून मोर्शीकडे प्रचारासाठी जात होते. त्यावेळी, एका चार चाकी वाहनातून ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी गाडीतून उतरत अपक्ष उमेदवारांची विचारपूस केली. त्यानंतर उमेदवार विवेक गवालेकर यांना मारहाणही करण्यात आली. तसेच, तू जर पाठिंबा दिला नाही तर तुझा मर्डर करणार अशी धमकीही अज्ञातांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, विकेश गवालेवर यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अमरावती मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात, १९ अपक्ष 

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ३३ पैकी १० उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर केलेल्या किरण चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसकडून धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, बहुजन भारत पार्टीचे डॉ. गौरव गवई हे राजकीय पक्षाचे चार उमेदवार असून उर्वरित १९ अपक्ष उमेदवार आहेत. पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस मिळणार असल्याने अक्षरश: पायाला भिंगरी लावून पदवीधरांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीElectionनिवडणूकPoliceपोलिसPoliticsराजकारण