शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विटेऐवजी शिक्षणाचा साचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:51 AM

पोटाची भ्रांत असल्याने मुलींना शिकविणार कसे, हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबाचा प्रश्न बालरक्षकाच्या पाठपुराव्याने सुटला. त्यांच्या दोन मुलींसाठी शिक्षणाची दारे आता उघडी झाली आहेत.

ठळक मुद्देबालरक्षक ठरला देवदूत : दोन सख्ख्या बहिणींकरिता शिक्षणाची दारे झाली खुली

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पोटाची भ्रांत असल्याने मुलींना शिकविणार कसे, हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबाचा प्रश्न बालरक्षकाच्या पाठपुराव्याने सुटला. त्यांच्या दोन मुलींसाठी शिक्षणाची दारे आता उघडी झाली आहेत.अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडल्याने सुमित चवरे व त्यांच्या पत्नीला कधी शेतात मजुरी, तर कधी वीटभट्टीवर काम करून चरितार्थ चालवावा लागतो. दगड, माती, रेती, काँक्रीट, राख या साचेबद्ध ठोकळ्यात दोन मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले. त्यातच गावात काम नसल्याने त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू केली. आपसूकच चौथीतील सुहानी व पाचवीतील राणी यांचे शिक्षण अर्ध्यातून सुटले. विटांच्या साच्यापुरतेच त्यांचे आयुष्य उरले होते. यांची माहिती उच्चश्रेणी मुख्याध्यापक जगदीश शिरसाट व मुख्याध्यापक सुभाष पुसदकर यांनी गटसाधन केंद्रातील बालरक्षक शेषराव चव्हाण यांना दिली. लगेच सुमित चवरे यांची भेट घेऊन शिक्षण हमी कार्डनुसार मुलींच्या शाळा प्रवेशाविषयी माहिती देण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर अंजनसिंगी येथून दोन्ही मुलींचे शिक्षण हमीकार्ड बनविले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी जुना धामणगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत सुहानी हिला इयत्ता चौथीत, तर दिव्यांग राणीला पाचवीत प्रवेश देण्यात आला. दोन्ही मुलींना लेखन साहित्य मिळाले तसेच शाळेचे शिक्षक व साधन व्यक्तींनी शाळेपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड, गटसमन्वयक गौतम गजभिये, केंद्रप्रमुख दिलीप चव्हाण, मुख्याद्यापक मधुकर तितुरमारे, धीरज जवळकर, कलेश कांबळे, वैशाली लिल्हर्वे, ज्योती राऊत, विषय साधन व्यक्ती व विशेष शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Educationशिक्षण