शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे अमरावतीत आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 16:34 IST

नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे.

अमरावती - नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांचे निकष ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा पुरस्कृत या शिबिरात गुणांच्या कसोटीतून निवड झालेल्या अकरावीतील विद्यार्थ्या$ंना नामवंत अशा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञांचे व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रायोगिक कृतीद्वारे मार्गदर्शन लाभणार आहे, शिवाय थेट संवाददेखील साधता येईल. आयआयटी, आयआयएसईआर, आयसीटी, सीसीएमबी, एचबीएससीई अशा राष्ट्रीय संस्थांमधील विख्यात शास्त्रज्ञ मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पद्मभूषण विजय भटकर, नरसिम्हन (बीएसआय), बी.एन. जगताप (आयआयटी, मुंबई), डॉ. दलाई (आयआयटी, कानपूर), रमेश अग्रवाल (सीसीएमबी, हैदराबाद), संजीव झाडे (आयआयएसईआर, कोलकाता), अशोक रूपनेर (आयआयएसईआर, पुणे), शशांक म्हस्के, (इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई), हरिता रावळ (डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई), विकास गुप्ता (डीएव्ही महाविद्यालय, अमृतसर) यांचा सहभाग राहणार आहे. शिबिरात निवड होण्यासाठी  आॅनलाइन पद्धतीने १ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याकरिता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर किंवा आयोजन सचिव दिनेश खेडकर यांच्या इमेलवर विद्यार्थ्यांना संपर्क करावयाचा आहे, असे प्राचार्य विजय ठाकरे यांनी कळविले आहे. 

विद्यार्थी निवडीची पात्रता निवासी शिबिरात सहभागाकरिता अर्ज करणारा विद्यार्थी हा अकरावीत शिकणारा असावा. संस्थेने त्याची शिफारस केलेली असावी. दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळात ९३.६० टक्क््यांहून अधिक, सीबीएसईमध्ये ९५ आणि आयसीएसई मध्ये ९६.८० टक्के गुण असावे. यापूर्वी अशाप्रकारे इंटर्नशिप कॅम्प कुठेही इतरत्र केलेला नसावा. 

इन्स्पायर कॅम्पच्या माध्यमातून गुणवत्ताधारकांना ज्ञानाची भूक भागविण्याची ही संधी विदर्भातील केंद्रस्थानी असलेल्या महाविद्यालयास प्राप्त झाली आहे. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी शिबिरात भविष्यातील कारकिदीर्तील सर्वोच्च शिखराची संकल्पना दृढ करण्याच्या व त्यासाठीची वाट चोखंदळायच्या निश्चयासह दाखल व्हावे.- विजय ठाकरे, प्राचार्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था 

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशिष्ट मार्गाने प्रेरित करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग विशिष्ट पद्धतीने रचनाबद्ध केलेल्या शिबिराचे आयोजन करीत आहे. १५० विद्यार्थ्यांना या माध्यमातून संधी मिळणार असून, जागतिक पातळीचे शास्त्रज्ञ निर्माण होण्याची मुहूर्तमेढ या शिबिरात रोवली जावी, अशी अपेक्षा आहे. - दिनेश खेडकर, आयोजन सचिव

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र