शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी : अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 08:16 IST

चहा विक्रेत्याच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास, उच्च शिक्षणासाठी उंच भरारी

- गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मनामध्ये शिकण्याची जिद्द असेल तर घरची आर्थिक परिस्थिती आड येत नाही, हे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाने सिद्ध करून दाखविले आहे. चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने झोपडीत अभ्यास करून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला आहे. तो शिक्षणासोबतच फावल्या वेळात नोकरी करणार असल्याने त्याला दरमहा दीड लाख पगार मिळेल. विकासच्या या भरारीमुळे त्याचे आई-वडील आणि मित्रमंडळी भारावून गेले आहेत.

विकासचे वडील कृष्णा तातड हे येथील दयासागर रुग्णालयाजवळ चहाची टपरी चालवतात, तर आई रेखा यांनी घरीच छोटेसे दुकान टाकून उदरनिर्वाहाचे साधन मिळविते. त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी कशीबशी तरतूद करीत गेले. जेथे दहावीनंतर शाळा सोडून दोन-चार पैसे हाती येण्यासाठी कष्टाची वाट धरली जाते, त्या परिसरात राहूनही विकासने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.

केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून बी.कॉम. झाल्यानंतर मुंबईच्या  टीआयएसएसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याच दरम्यान त्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, असा निर्धार केला. मात्र, या शिक्षणासाठी त्याला सव्वा कोटी रुपये खर्च येत होता.

    तीनदा नाकारला व्हिसाn महाराष्ट्र सरकारची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती विकासला मंजूर झाली. मात्र, व्हिसा काढताना या शिष्यवृत्तीशिवाय खात्यात किती पैसे आहेत, अशी विचारणा झाली. n खात्यात पैसे नसल्याने बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे तब्बल तीनवेळ व्हिसा नाकारला गेला. n अखेर चौथ्यांदा समाजातील काही नागरिकांनी त्याला ३० ते ४० लाख रुपयांची मदत केली आणि व्हिसाची प्रक्रिया पुढे सरकली. भविष्यात देशातील जातीव्यवस्था कमी व्हावी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील भेदाभेद नष्ट करायचे आहे. लहान-मोठ्या शाळांमध्ये प्रचलित अभ्यासक्रमांऐवजी बदलत्या काळानुसार शिक्षण प्रणालीसाठी संशोधन करण्याचा मानस आहे.        - विकास तातड, अमरावती.