सीबीनॅटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : तर लवकरच भूमिपूजनभंडारा : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जिल्हा महिला रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता निकाला निघाला असून पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज जलशुध्दीकरण केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या जागेची पाहणी केली. या जागेच्या संदर्भातील सर्व नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांना दिली. लवकरच ही जागा आरोग्य विभागाला हस्तांतरीत करुन महिला रुग्णालयाचे भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी दिली. त्यामुळे लवकरच महिलांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा देणारी महिला रुग्णालयाची इमारत येत्या तीन वर्षात उभी राहील, असे पालकमंत्री यावेळी आवर्जुन म्हणाले.सीबीनॅटचे लोकार्पण क्षयरोग तपासणीसाठी उपयुक्त असलेल्या अत्याधुनिक मशिन सीबीनॅटचे लोकार्पण पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, भंडारा नगराध्यक्ष बाबुराव बागडे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, क्षय व कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक संजीव कांबळे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल उपस्थित होते. यावेळी सीबीनॅट मशिनचे फायदे व उपयुक्तता तसेच मशिनची कार्यप्रणाली इत्यादीबाबत नागपूरचे तंत्रज्ञ तणविर यांनी पालकमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी
By admin | Updated: May 3, 2016 00:45 IST