शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:07 PM

तालुक्यात लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मागणी सातत्याने केली जात आहे.

ठळक मुद्देदोन वेळा लक्षवेधी : पशुधनाची शासनाला काळजीच नाही

सुमित हरकूटआॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : तालुक्यात लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, हा प्रश्न गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. पशुधनाला योग्य आरोग्य उपचार मिळत नसल्यामुळे आपले पशुधन विकायची वेळ पशुमालकांवर येऊन ठेपली आहे.शेतकऱ्यांचे पशुधन ही संपती असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राहिल्यास त्यांच्यापासून आर्थिक लाभ होतो. त्यामुळेच जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावे, यासाठी सरकारने शासकीय यंत्रणा उभारली आहे. मात्र, चांदूर बाजार येथील पशू चिकित्सालयात पुरेसा साधन सामग्री नसल्याने पशूपालकांची व जनावरांची परवड होत असल्याचे चित्र आह. सात वर्षापूर्वी ४ नोव्हेंबर २०१० रोजी स्थानिक पंचायत समितीने सर्वसाधारण मासिक सभेत जनावरांसाठी मिनी पॉलीक्लिनिकचा ठराव घेतला होता. आ. बच्चू कडू यांनी दोनदा लक्षवेधी लावूनही हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.आ. कडू यांनी १८ मार्च २०१६ ला हे प्रकरण प्रधान सचिव, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे लावून धरले. पशुसंवर्धन मंत्री यांच्यासोबत चर्चाही केली. आ. अनिल बोंडे व आ. विनायक पाल यांनी यास अनुमोदनही दिले होते. परंतु विधिमंडळ सभागृहात आश्वासना शिवाय काहीच हाती आले नाही.तालुक्यात ७५ हजार २३४ पशुधन२०१२ च्या पशुगणनेनुसार सध्या तालुक्यात ७५ हजार २३४ पशुधनाची संख्या आहे. यात गाय-बैल ३२ हजार ४९३, रेडे-म्हैस ८ हजार २८७, शेळ्या २७ हजार ८१, मेंढर २ हजार १७८, घोडे ३३, गाढवे ११७ व वराह ३६९ याप्रमाणे आहेत. तालुक्याच्या ठिकाणी लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय झाल्यास सर्वच जनावरांना सोनोग्राफी, क्ष-किरण, रक्त तपासणी सेवा यासारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या तालुक्यात १३ पशुवैद्यकीय दवाखाने असून यात सात प्रथम श्रेणी व सहा द्वितीय श्रेणी दवाखाने आहेत.