शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांची चौकशी; १३ जिल्ह्यांंचा पदभार कसा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 16:50 IST

येथील आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे हे पूर्वी नागपूर येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांच्या गैरकारभाराची तक्रार भारतीय आदिवासी पँथर संघटनेद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सात आॅगष्ट रोजी करण्यात आली होती.

अमरावती : येथील आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे हे पूर्वी नागपूर येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांच्या गैरकारभाराची तक्रार भारतीय आदिवासी पँथर संघटनेद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सात आॅगष्ट रोजी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने आदिवासी विभागाचे कार्यासन अधिका-यांनी नाशिक येथील आदिवासी विभागाच्या आयुक्तांना चौकशी करून स्वंयस्पष्ट अहवाल मागितला आहे.भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये सरोदे यांनी गैरव्यवहार केला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांंच्या बदली प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची तक्रार भारतीय आदिवासी पँथरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोबडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. याप्रकरणी आदिवासी  विभागाचे कार्यासन अधिकारी योगेश सावंत यांनी आदिवासी विभागाचे नाशिक येथील आयुक्तांना प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे. जर या प्रकरणात सरोदे दोषी असतील तर त्यांच्याविरुद्ध योग्य  शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्याअनुषंगाने बजावावयाचे प्रारूप दोषारोपपत्र आवश्यक त्या कागदपत्रासह शासनाला सादर करण्याविषयीचे सूचित केले आहे.नागपूर येथे प्रकल्प अधिकारी असताना सरोदे यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत गैरव्यवहार केला होता. २२,६५० रूपयांची शिष्यवृत्ती परस्पर उचलल्याप्रकरणी गोंदियाचा विद्यार्थी देवराम मरसकोल्हे याने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल झालेला आहे. नागपूर येथील अनेक प्रकरणात त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. अनेक प्रकरणांत गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या अधिका-यांकडे १३ जिल्ह्यांचा कारभार असलेला आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांचा पदभार दिलाच कसा, असा सवाल बोबडे यांनी मुख्यंत्र्यांना सादर निवेदनात केला आहे. यासंदर्भात सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत, ते सध्या रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

विभागीय चौकशी सुरू असताना १३ जिल्ह्यांंचा पदभार कसा ?शासकीय अधिका-यांकडे अधिकार सोपविण्याचा प्रतिबंध नियमाप्रमाणे शिस्तभंगविषयक नियमानुसार  कोणत्याही अधिका-याच्या विरोधात गंभीर प्रकरणात चौकशी, दोषारोपण, विभागीय चौकशी, फौजदारी खटला किंवा अन्वेषणास सामोरे जावे लागत असल्यास अशा अधिका-यांकडे अंमलबजावणीच्या संदर्भातील कामाबाबतचा किंवा विषयाबाबतचे निर्णय घेण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत, असे तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती