शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

सुधारित पैसेवारीसाठी पश्चिम विदर्भाला उफराटा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 1:39 PM

दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली.

ठळक मुद्देबाधित खरिपाची ६० पैसेवारी परतीच्या पावसाने ५३८२ गावांत १२.२२ लाख हेक्टरमध्ये नुकसान

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. महसूल यंत्रणाद्वारे या बाधित पिकांचे सर्वेक्षण सुरू असताना विभागीय आयुक्तांनी १ नोव्हेंबरला विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैसे असून, यामध्ये फक्त अकोला जिल्ह्याला न्याय देण्यात आला, तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात वस्तुस्थिती अव्हेरली गेली आहे.अमरावती विभागात १८ ते २८ आॅक्टोबर दरम्यान ८४.१ मिमी पाऊस पडला. ही अपेक्षित ४५ मिमी पावसाच्या तुलनेत टक्केवारी १८६.५ आहे. या परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वार, मका, धान पीक होत्याचे नव्हते झाले. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पीक सडले. गंज्या ओल्या झाल्याने बीजांकुर फुटले. दाण्यांना बुरशी चढली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे जागेवर सडायला लागली आहेत. ज्वारी काळी झाल्याने प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांसमोर समोर जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला असताना महसूल विभागाद्वारे जाहीर सुधारित पैसेवारीत मात्र खरिपाचे चित्र आॅलवेल असे मांडण्यात आल्याची शोकांतिका आहे.सुधारित पैसेवारीमध्ये अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत ४८ पैसेवारी जाहीर झाल्याने न्याय मिळाला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ६२, वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ६१, यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ५८ व बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ६९ सुधारित पैसेवारी दाखविण्यात आली. अद्याप अंंतिम पैसेवारी बाकी असली तरी महसूल विभागाद्वारे वस्तुस्थिती डावलण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.पश्चिम विदर्भात खरिपाचे बाधित क्षेत्रविभागीय आयुक्तांच्या निर्देशान्वये बाधित खरिपाचे संयुक्त सर्वेक्षण महसूल यंत्रणा २९ आॅक्टोबरपासून युद्धस्तरावर करीत आहे, मात्र, याच यंत्रणाद्वारे खरिपाची सुधारित पैसेवारी ६० दाखविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात १,४५,०५३ हेक्टर, अकोला ३,२३,५३५, बुलडाणा ५,१९,१९६, यवतमाळ १,०४,५५९ व वाशिम जिल्ह्यात १,२५,९३५ हेक्टरमधील पिके ३३ टक्क्यांवर बाधित झाली आहेत. तरीदेखील सुधारित पैसेवारी ६० कशी, अशा शेतकऱ्यांचा सवाल आहे.जिल्हानिहाय सुधारित पैसेवारीजिल्हा                     गावे                     पैसेवारीअमरावती                १९६१                        ६२अकोला                   ९९०                         ४८यवतमाळ                २०४८                     ५८वाशिम                       ७९३                        ६१बुलडाणा                   १४१९                       ६९एकूण                        ७२९९                         ६०

टॅग्स :Farmerशेतकरी