शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीत त्रुटी : राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:23 IST

त्येक विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत राहावा म्हणून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे अनेक वर्षांपासून काम करीत आहे.

- मोहन राऊतअमरावती - प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत राहावा म्हणून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे अनेक वर्षांपासून काम करीत आहे. तीन वेतन आयोगात राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याने या कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आजाद मैदानावर हे कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यात प्रयोगशाळा सहायक, परिचरांची १८ हजार पदसंख्या आहे. राज्य शासनाच्यावतीने या शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस अन्याय वाढत आहे. या कर्मचाºयांना केंद्राप्रमाणे वेतन आयोग लागू असताना प्रयोगशाळा सहायक व परिचरावर राज्य सरकार अन्याय करीत आहे. केंद्र सरकारने चौथ्या वेतन आयोगात १२०० रुपये देण्यात आले. राज्य शासनाने राज्यातील शाळांमध्ये फक्त ९७५ रुपये देऊन अन्याय केला आहे. पाचवा वेतन आयोगात ४ हजारऐवजी ३२०० रुपये, तर सहाव्या वेतन आयोगात फक्त दोन हजार रुपये ग्रेड पे देऊन तोंडाला पाने पुसली आहे. सहाव्या वेतन आयोगात २४०० रुपये ग्रेड पे देण्यात यावा, तर १२ वर्षांनंतर ४२०० रुपये ग्रेड पे देऊन कालबद्ध पदोन्नती लागू करावी. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सहायक परिचर यांचे पद ते तांत्रिक असल्यामुळे त्यांनाही वरिष्ठ श्रेणी २४०० रुपये व कालबद्ध पदोन्नती लागू करावी. आकृतिबंधमध्ये प्रयोगशाळा परिचरांचे पद व्यपगत करण्याचा डाव रचण्यात आला आहे. ज्या प्रयोगशाळा सहायक व परिचरांच्या भरवशावर प्रात्यक्षिकांची रचना व विज्ञान शिक्षकांना प्रात्यक्षिके देण्यासंबंधी मोठी होते, हेच पद नष्ट करणारा आकृतिबंध तत्काळ रद्द करावा. प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या सुधारित सुधारित आकृतिबंधाला मान्यता द्यावी, १२ वर्ष व २४ वर्षे कालबद्ध पदोन्नती द्यावी, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी ज्या प्रयोगशाळा सहायक व परिचरांचे प्रात्यक्षिक उत्कृष्ट असते त्या जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्यांना एक वेतन वाढ अधिकची   प्रोत्साहन म्हणून द्यावी आदी मागण्या पूर्ण करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा सहायक, परिचरांचा मागणीसाठी लढा सुरू आहे. यासाठी २६ नोव्हेबर रोजी आजाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहे.- भरत जगताप राज्याध्यक्ष, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ मुंबई

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र