शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:25 IST

पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देवडाळीतील बांबू गार्डनमधील घटना : फे्रजरपुरा पोलीस पोहोचले घटनास्थळी

अमरावती : पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जखमी रुग्णालयात पोहोचले होते.नवनिर्मित बांबू गार्डनमध्ये जगविख्यात विविध प्रजातीच्या बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली असून ते पर्यटनस्थळ म्हणून आकर्षण ठरत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक तेथे आनंद घेण्यासाठी जातात. त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी शिवशक्ती कॉलनीतील योगा क्लॉसेसमधील २५ ते ३० महिला व त्यांचे लहान मुले-मुली बांबू गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान सगळीकडे निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर काही महिला 'जॉय ट्रेन'मध्ये बसल्या. मात्र, धावत्या ट्रेनचा मागील डब्बा उलटल्यामुळे सर्व डब्बेच खाली कोसळले. या अपघातात दोन महिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अन्य महिला जखमी झाल्यात. ही माहिती सागर नामक चालकाने वरिष्ठ अधिकाºयांना दिली. वनकर्मचाºयांनी महिलांना तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले.अशी आहेत जखमींची नावेट्रेन उलटून जखमी झालेल्या महिलांमध्ये ममता अरुण डवले (४२रा.शिवशक्तीनगर), सुनीता शालीकराम मोहोकार (४५,रा. महाविरनगर), मालती मनोहर नाईक (४८), अरुण कवले (४२), रजनी नारायण बाहेकर (६०), रजनी अशोक बलिंगे (४७), साधना नरेंद्र रावेकर यांचा समावेश आहे.ट्रेनचा मागील डब्बा उलटल्यामुळे अन्य डब्बेसुध्दा रुळावरून घसरले. या अपघातात सात महिला जखमी असून त्यापैकी एक महिला गंभीर आहे. अपघाताविषयी चौकशी सुरू आहे.- एच.व्ही.पडगव्हाणकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळीचालकाविरुद्ध नोंदविणार गुन्हा!बाबू गार्डनमधील ट्रेन चालविणारा सागर नामक इसम भरधाव ट्रेन चालवित असल्याचे जखमींचे म्हणणे आहे. त्याच्या कानात ईअरफोन असल्याचे महिलांनी सांगितले. घटनेचा पंचनामा फ्रेजरपुरा पोलिसांनी केला. जखमीच्या बयाणावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.