शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर लाल्या रोगाची लागण, मिरचीवर करपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. नगदी पीक असलेली कपाशी दुरून हिरवी दिसत असली तरी लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, तर मिरचीवर करपा जाणवू लागल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा सततच्या संकटांतून सावरण्यास निसर्गाने शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही. कृषी विभागाने रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. नगदी पीक असलेली कपाशी दुरून हिरवी दिसत असली तरी लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीवर करपा व ज्वारीवर चिकट्या (मावा) चा प्रादुर्भाव झाला, तर तुरीची झाडेही करपत असल्याने यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हातात दमडी शिल्लक नसतानादेखील मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. अनेकांनी कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनसह तूर , उडीद, मूग, मिरची, ज्वारीची सुद्धा पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु, मध्येच दीड महिना पावसाने संताधार लावल्यामुळे ज्वारी, उडीद, मिरची, कपाशी, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद काढणीसाठी आले तेव्हा पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने लागलेल्या शेंगांना व ज्वारीला कोंब फुटले आणि सोयाबीन, ज्वारीचे दाणे काळे झाले. काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवावे लागले. आता शेतकऱ्यांच्या आशा कपाशी आणि तुरीवर केंद्रित झाल्या असताना, फूल व बोंडांवर रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव झाला. कापसावर लाल्या रोगाने प्रहार केला. यापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकºयांनी तीन ते पाच वेळा महागडी औषधे फवारली. तरीही पात्या, बोंडे कमी प्रमाणात लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटू लागले. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे.

टॅग्स :agricultureशेती