शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: रेल्वे स्थानकावर मिळणार आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा, रेल्वे प्रशासन उपलब्ध करणार जागा

By गणेश वासनिक | Updated: August 11, 2022 15:56 IST

Railway Station: धावत्या गाडीत किंवा प्लॅटफार्मवर प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

- गणेश वासनिकअमरावती - धावत्या गाडीत किंवा प्लॅटफार्मवर प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता एमबीबीएस, एमडी डॉक्टरांकडून मागविले प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

प्रवाशांची गर्दी आणि मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची आवक-जावक असलेल्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा हा उपक्रम राबविला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यात प्राधान्य दिले जाणार  आहे. रेल्वे प्रशासनाने विभाग आणि रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली आहे. येथे आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव डॉक्टरांकडून मागविले जात आहे. त्यामुळे येत्या काळात धावत्या गाडीत वा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास तत्क्षण खासगी वैद्यकीय उपचार घेता येईल, अशी नवी संकल्पना आहे. विशेषत: जंक्शन रेल्वे स्थानकांवर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा मिळणार आहे. 

या रेल्वे स्थानकावर मिळेल वैद्यकीय सेवामध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्ग़त नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकावर दवाखाना साकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ईच्छुक डॉक्टरांना आयआरईपीएस या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच नागपूर रेल्वे विभागातील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेला प्रारंभ होणार आहे.

दवाखाना, फॉर्मसीसाठी जागा मिळेलरेल्वे स्थानकावर दवाखाना, फॉर्मसीसाठी प्रशासन जागा उपलब्ध करून देणार आहे. त्याकरिता जागेचे शुल्क आकारले जातील, अशी निविदेत अट आहे. हा सुसज्ज दवाखाना, फॉर्मसी रेल्वे स्थानक वा परिसरातच असेल, अशी जागेची व्यवस्था रेल्वे प्रशासन करून देईल, तशा सूचना वरिष्ठांच्या आहेत.

बाह्यरूग्ण सेवा असेलएमबीबीएस, एमडी डॉक्टरांकडून बाह्यरूग्ण सेवा देण्याबाबत प्रस्ताव मागविले आहे. दवाखान्यासोबत फॉर्मसीची सुविधा असणार आहे. प्रवाशांची तब्येत खराब झाल्यानंतर काही वेळातच संबंधितांना उपचारासाठी सोय व्हावी, असे आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेचे स्वरूप आहे. रेल्वे प्रशासनाने आकारलेल्या शुल्कानुसारच डॉक्टरांना खासगी वैद्यकीय सेवेचे शुल्क प्रवाशांकडून घ्यावे लागणार आहे. 

रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेबाबत २८ जुलै रोजी नोटिफिकेशन निघाले आहे. वेबसाईटवर प्रस्ताव मागविले आहे. डॉक्टरांना रेल्वेच्या अटी, शर्ती लागू असणार आहे. - डी. एल. मिना, निरीक्षक, खंड वाणिज्य बडनेरा रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेMedicalवैद्यकीय