कर्मचाऱ्यांचे बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:36+5:30

उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षणचे संचालक वाघ यांनी विद्यापीठ कर्मचारी कृती समितीसमवेत ऑनलाईन बैठक घेतली.संचालकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ या दोन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उच्च शिक्षण मंत्री उद्य सामंत यांना अगवत करण्यात येईल, असे संचालक माने यांनी सांगितले.

Indefinite closure of employees | कर्मचाऱ्यांचे बेमुदत बंद

कर्मचाऱ्यांचे बेमुदत बंद

Next
ठळक मुद्देतोडगा नाहीच : उच्च शिक्षण संचालकांची बैठक बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्च शिक्षण संचालकस्तरावरून बुधवारी सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून विद्यापीठात बेमुदत बंद आंदोलन सुरू होईल, अशी माहिती कर्मचारी संघाचे महासचिव विलास सातपुते यांनी ‘लोकमत’ला दिली.
उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षणचे संचालक वाघ यांनी विद्यापीठ कर्मचारी कृती समितीसमवेत ऑनलाईन बैठक घेतली.संचालकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ या दोन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उच्च शिक्षण मंत्री उद्य सामंत यांना अगवत करण्यात येईल, असे संचालक माने यांनी सांगितले. विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाला किमान दोन महिन्याचा वेळ मिळावा, अशी भूमिका उच्च शिक्षण संचालक माने यांनी मांडली. मात्र, यासंदर्भात शासनादेश निर्गमित झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचा संप मागे नाही, अशी रोखठोक बाजू कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष अजय देशमुख यांनी मांडली. आश्वासन नको, जे काही असेल ते लेखी हवे. त्यानंतरच कर्मचारी संपाबाबत निर्णय होईल, या मुद्द्यावर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी ठाम होते. त्यामुळे संचालक माने व वाघ हे दोन्ही संचालक शासनाची बाजू मांडण्यासाठी ऑनलाईन हजर झाले तरी त्यांना विद्यपीठ कर्मचाऱ्यांच्या रोषापुढे नमावे लागले. परिणामी १ ऑक्टोंबरपासून विद्यापीठ बेमुदत बंद आंदोलन सुरु राहील, हे आता स्पष्ट झाले आहे.

परीक्षा विभागासमोर कर्मचाऱ्यांची सभा
विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनाचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्याअनुषंगाने परीक्षा विभागासमोर संपकरी अधिकारी, कर्मचारी एकवटले. गुरुवारपासून बेमुदत संपाबाबतची भूमिका अजय देशमुख, नितीन कोळी, विलास सातपुते, शशिकांत रोडे यांनी मांडली. दरम्यान नुटा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी कर्मचारी संपाला जाहीर पाठींबा दिला. नुटाचे रघुवंशी यांनी शासनाकडून आंदोलन कसे परतवून लावले जाते, हे काही उदाहरणाद्वारे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ठोस हाती आल्याशिवाय संप मागे घेऊ नका,अशी विनंती रघुवंशी यांनी कर्मचाऱ्यांना केली. आंदोलन तीव्र करा, तरच मागण्या मंजूर होतील, असेही ते म्हणाले. कर्मचारी सभेला मोठी गर्दी होती. दरम्यान दिनेश सूर्यवंशी, अंबादास मोहिते यांनीही संपाला पाठिंबा दिला.

Web Title: Indefinite closure of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.