शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

सर्दी, खोकला, व्हायरल डायरियाच्या आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:30 IST

वातावरणातील अचानक बदलामुळे तसेच थंडीतील चढउतार आजाराला निमंत्रण देत आहे. सर्दी, खोकला, अस्थमा व पोटाच्या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्याच कारणाने रोज शेकडो रुग्ण शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेत आहेत.

ठळक मुद्देवातावरणात बदल : शेकडो रुग्णांची रुग्णालयाकडे धाव

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणातील अचानक बदलामुळे तसेच थंडीतील चढउतार आजाराला निमंत्रण देत आहे. सर्दी, खोकला, अस्थमा व पोटाच्या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्याच कारणाने रोज शेकडो रुग्ण शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेत आहेत.येथील इर्विन रुग्णालयात रोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी होत आहे. यातील अनेक रुग्ण उपचारासाठी दाखलसुद्धा होत आहेत. प्रत्येक खासगी दवाखान्यांमध्ये १५ ते २० रुग्ण विविध प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्याची माहिती, विविध डॉक्टरांनी दिली. या दिवसांत हवेतून विविध संसर्ग होऊन विविध आजार नागरिकांना जडत आहेत. तसेच ग्रामीण भागातील काही गावांमध्ये लहान मुलांमध्ये गालफुगीच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.अशी घ्यावी काळजीलहान मुलांमध्ये या दिवसांत विविध आजाराचे प्रमाण वाढत असते. कुठल्याही आजारांची लक्ष्णे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी मुलांना नेले पाहिजे. तसेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्या कारणाने न्यूमोनिया होण्याची शक्यताही अधिक असते. त्या कारणाने निमोनिया व स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपचार करून घेतले पाहिजे, असे मत बालरोगतज्ज्ञ धीरज सवाई यांनी व्यक्त केले.लहान मुलांमध्ये व्हायरल डायरियावातावरणात अचानक बदल झाल्यामुळे व गारवा व थंडी वाढल्याने लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस हे आजार प्रामुख्याने होत आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्या कारणाने विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार बळावतात. पोेटाचे विकार वाढतात.संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी हे करासर्दी, ताप व खोकला व इतर आजारांपासून बचावासाठी या दिवसांत उबदार कपडे परिधान करावे, गरम पाण्यात गुळण्या करणे, थंड व फ्रिजमधील पाणी किंवा फ्रिजमधील पदार्थ न खाणे, तसेच लहान मुलांनी थंडीच्या वेळेत बाहेर न पडणे आदी प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, व बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे तसेच स्वच्छ कपडे वापरावे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.या दिवसांत व्हायरल डायरियासारखे आजाराचे रुग्ण तपासणी करण्याकरिता येतात. लहान मुलांची थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी न्यूमोनिया व स्वाईन फ्लूचे निदान करुन घेतले पाहिजे.- धीरज सवाई,बालरोगतज्ज्ञ अमरावतीया दिवसाची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, अस्थमा व इतर आजाराचे रुग्ण तपासणी करीता येत आहेत.- विलास पाटील,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक