शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

अपूर्ण घरकुले; १४ एचओंडीची स्पॉट व्हिजिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:00 IST

सीईओंनी सोपविली होती जबाबदारी : २८ ग्रामपंचायतींमधील गावात पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कडक पावले उचलत आपल्या अधिनस्त असलेल्या १४ विभागांच्या प्रमुखांना या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश दिले होते.

या भेटीदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थ्याशी भेटून बंद असलेले घरकुलाचे कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या विभागप्रमुखांनी २८ ग्रामपंचायतींमधील विविध गावांत स्पॉट व्हिजिट करत घरकुलाच्या कामाची पाहणी केलेली आहे.

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर चार टप्प्यांत घरकुलाचा निधी दिला जातो. केंद्र पुरस्कृत आवास योजनेंतर्गत सन २०१६ ते २०२२ या कालावधीत मंजूर केलेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. मात्र, घरकुल बांधकामास सुरुवात न केल्याने दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला नाही. घरकुल पूर्णत्वाची जिल्ह्याची प्रगती राज्यस्तरावर मागे पडत असल्याने शासनाकडून याची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील किमान दोन ग्रामपंचायती अशा २८ ग्रामपंचायतींमध्ये अर्धवट घरांच्या स्पॉट व्हिजिटसाठी निवडले होते. यासाठी झेडपीच्या १४ खातेप्रमुखांना जबाबदारी सोपविली होती. सीईओंनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यातच २८ ग्रामपंचायतींत स्पॉट व्हिजिट दिली आहे.

या दरम्यान, येथील पहिल्या हप्त्यानंतर घरकुल न बांधण्याचे कारण तसेच संबंधित लाभार्थ्याशी अडचणी प्रत्यक्ष संवादादरम्यान जाणून घेण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. यावर आता पुढील कारवाईबाबत दिशा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठरणार आहे

या ग्रामपंचायतींना दिल्या भेटीभातकुली तालुक्यातील पूर्णानगर, खारतळेगाव, धामणगाव रेल्वेमधील मंगरुळ दस्तगीर, विरुळ राधे, अमरावती तालुक्यातील वलगाव, यावली, वरूड तालुक्यातील मांगरोळी, जरूड, अचलपूर मधील शिंदी बु., पथ्रोट, धारणीतील हरिसाल, रंगुबेली, चिखलदरातील रायपूर, चिखली, अंजनगाव सुर्जीमधील चौसाळा, कापुसतळणी, नांदगाव खंडेश्वरमधील खानापूर, दाभा, चांदूरबाजारमधील विश्रोळी, सोनोरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, राजुरा, मोशातील अंबाडा, नरपिंगळाई, तिवसामधील शिरजगाव मोझरी, तळेगाव व दर्यापूरमधील येवदा, सांगळूद या ग्रामपंचायतींचा समावेश होता.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती