शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पडले. त्यामुळे हंगामाच्या शेवटी हाती कातय येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना सयावतो आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव: शेतमालाच्या आधारभूत किमतींमुळे शेती व्यवसाय तोट्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार: शेतमाल विक्रीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. मात्र ज्या मूल्यांकनाने शेतीमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, ते शासनाचे गणित प्रत्यक्षात चुकीचे ठरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपय्या’ या म्हणीप्रमाणे झाला आहे. यामुळेच शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली अडकला आहे. यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पडले. त्यामुळे हंगामाच्या शेवटी हाती कातय येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना सयावतो आहे.आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारे भाव म्हणजे ‘किस गली मे खसखस’ ज्या भावात शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करावा लागते ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी उलट कर्जबाजारी होत चालला आहे. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला दिवसासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुराच्या तुलनेत मजुरी सुद्धा मिळत नाही. एकंदरीत शेतीव्यवसायला आधारभूत किंमतही नुकसान दायक ठरली आहे. शेतकरी खरीप हंगामात जवळपास तीन महिने कुटुंबासह दिवसभर राबतो. मात्र हाती काहीही येत नाही. यंदाही तिच परिस्थिती उद्भवली आहे.शेतकरी कर्जाच्या डोंगराखालीशेतकरी कर्जामुळे मृत्यूलाही कवटाळत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कुटुंबातील कमीत कमी तीन व्यक्ती शेतकामात व्यस्त असतात. एकंदरीत शेतकरी कुटुंबाला दिवसाकाठी ६० ते ७० रुपये मजुरी पडत आहे. म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुरापेक्षा कितीतरी कमी पटीने मजुरी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहेत. अनेकदा कर्जाच्या डोंगराखाली सापडलेला शेतकरी मृत्यूला सुद्धा कवटाळत आहे. यासाठी शासनाची शेतमालावर अवलंबून असलेली ा मूल्यांकन पद्धतच कारणीभूत ठरत आहे. हे उघडपणे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती