शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचे लोकार्पण म्हणजे राजकीय 'टेकऑफ'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:10 IST

डॉ. सुनील देशमुख : बेलोरा विमानतळ मैलाचा दगड ठरेल, पण..!

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येत्या ९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेले बेलोरा विमानतळाचे लोकार्पण म्हणजे निवडणुकीपूर्वीचे राजकीय 'टेकऑफ' असल्याचा घणाघात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

लोकार्पणासाठी एमएडीसीकडून लगबग सुरू असली तरी अद्याप नागरी विमान वाहतूक संचालनालयाची परवानगी मिळाली नाही. शिवाय अत्यंत महत्त्वाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कामही पूर्णत्वास आलेले नाही. त्यामुळे कामे अर्धवट असताना लोकार्पणाची घिसाडघाई केवळ निवडणुकीवर डोळा घेऊन घेतलेला निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पायाभूत सुविधा व औद्योगिक विकासात बेलोरा विमानतळ मैलाचा दगड ठरणार आहे. परंतु, होऊ घातलेले लोकार्पण अर्धवट विमानतळाचेच असून, केवळ टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण झाले आहे. 

अपूर्ण असलेली कामे 

  • प्रवासी विमानांच्या परिचालनाकरिता सर्वात महत्त्वाचे असते ते एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर. विमानाचे लैंडिंग आणि टेकऑफ याचे संपूर्ण नियंत्रणच याद्वारे केले जाते. याचे कार्यान्वयन अद्यापही अपूर्ण आहे. 
  • देशातील सर्व विमानतळांचे नियमन करणाऱ्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए) या संस्थेची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • प्रवासी विमानाची सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपनीला या मार्गावर परवाना मिळाला आहे त्यांच्याकडून अद्यापही प्रस्तावित प्रवासी सेवेचा मार्ग, त्यांचे वेळापत्रक याबद्दल कोणतीही निश्चिती झालेली आहे. 
  • विमानतळ परिसरात हरीण, रोही यासारख्या जंगली प्राण्यांचा मोठा वावर आहे. हे सगळे प्राणी वनविभागाद्वारे रेस्क्यू करून दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहेत तेही काम अद्याप बाकी आहे. त्याशिवाय विमानांचे सुरक्षित टेकऑफ आणि लँडिंग शक्य होणार नाही.

 

"विमानाचे उहाणच जर होणार नसेल तर घाईघाईत विमानतळाचे लोकार्पण करणे म्हणजे अमरावतीकरांची फसवणूक करणे होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय लोकार्पण करणे एवढाच या मागचा उद्देश दिसतो."-डॉ. सुनील देशमुख माजी राज्यमंत्री

टॅग्स :Amravatiअमरावती