शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये सहा महिन्यात ३८ जुळे, तर एकीला तिळे आले जन्माला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 12:39 IST

Amravati : जिल्हा स्त्री-रुग्णालयात महिलांची यशस्वी प्रसूती

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : काही स्त्रिया प्रसूतीदरम्यान एकाच वेळी दोन किंवा तीन बाळांना जन्म देतात. एका आकडेवारीनुसार ४० पैकी एक महिला जुळ्या बाळांना जन्म देते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये शहरातील जिल्हा स्त्री- रुग्णालय (डफरीन) येथे ३८ मातांनी जुळ्यांना, तर एका मातेने तिळ्यांना जन्म दिला आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक आठ महिलांनी जुळ्यांना जन्म दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जुळे मूल जन्माला येण्याचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक आयडेंटिकल आणि नॉन- आयडेंटिकल. वैद्यकीय भाषेत, त्यांना मोनोझिगोटिक आणि डायझिगोटिक म्हणतात. सहसा, महिलेच्या शरीरात अंडे असते, जे शुक्राणूंच्या साहाय्याने एक गर्भ तयार करते. मात्र, या गर्भात अनेकदा एक नव्हे तर दोन मुले तयार होतात. ही जुळी मुले एकाच अंड्यातून तयार झालेली असतात. त्यामुळे त्यांची नाळदेखील समान असते. या अवस्थेत एक तर दोन मुले जन्माला येतात किंवा दोन मुली. त्यांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असले तरी ते सामान्यतः दिसायला सारखे असतात.

कोणत्या महिन्यात किती?महिना               जुळे                 तिळेजानेवारी              ०७                     ००फेब्रुवारी              ०४                      ००मार्च                   ०६                      ००एप्रिल                  ०८                     ००मे                       ०७                     ००जून                     ०६                     ०१

जुळे-तिळे जन्माची कारणेजेव्हा एकाऐवजी अनेक शुक्राणू आणि बीजातून गर्भ तयार होतो तेव्हा तो दोन ठिकाणी विभागला जातो. प्रत्येक गर्भ हा गुणसुत्रांच्या भाषेत जवळपास सारखा आणि अनुवांशिकदृष्ट्या एकसारखा असतो. बहुतेक वेळा या दोन्ही गर्भाचे लिंग सारखेच असते. गर्भाशयात त्यांचे विभाजन केव्हा होते, यावर त्यांच्यातील नंतरचा सारखेपणा अवलंबून असतो. अनेकदा जुळी मुले एकसारखी दिसत नाहीत. त्या गर्भाच अस्तित्व दोन वेगळ्या बीजांतून आणि शुक्राणूंतून तयार झालेले असते. अशा गभर्भातील भ्रूणांचे लिंग सारखे किंवा वेगळे असते. बराच वेळा जुळी ही गर्भधारणेतून केलेल्या उपचारांमुळे गर्भाशयात तयार झालेली असतात.

सहा महिन्यांत ३८ जुळे, एक तिळे शहरातील जिल्हा स्त्री- रुग्णालय (डफरीन) येथे रोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. या ठिकाणी मागील सहा महिन्यांमध्ये ३८ मातांनी जुळ्यांना जन्म दिला आहे; तर एका मातेने तिव्ळ्यांना जन्म दिला आहे. या सर्व प्रसूती यशस्वी करण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे.

"जिल्हा स्त्री-रुग्णालयात जिल्हाभरातून गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. रोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. मागील सहा महिन्यांमध्ये रुग्णालयात ३८ महिलांनी जुळ्ळ्यांना जन्म दिला, तर एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे."- डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक, डफरीन

 

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र