शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळाचेही दर्शन

By गणेश वासनिक | Updated: May 8, 2023 17:43 IST

Amravati News मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविण्यात आला.

गणेश वासनिक

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविण्यात आला. २४ तास घनदाट १४० मचाणीहून पाणवठ्यावर २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर आदी वन्यप्राण्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असून, प्रत्यक्षात बघता आले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव विभाग तर अकोला, पांढरकसहा वन्यजीव विभागामध्ये निसर्गप्रेमींना ऑनलाईन पद्धतीने मचाण आरक्षित करून 'निसर्ग अनुभव' या उपक्रमात सहभागी होता आले. यात पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर व नंदुरबार येथील १४० निसर्गप्रेमींची उपस्थिती होती. या उपक्रमात जेवण, नाश्ता, पाणी, मचाणीवर नेे -आण करण्यासाठी वाहन, कॅप आणि मेळघाट पुस्तिका निसर्गप्रेमींना देण्यात आली होती.

दरम्यान वन्यप्राणी नोंद पत्रक सुद्धा देण्यात आली होती. रात्रीच्या वनातील निरामय संगीत, प्राण्यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर, हवेची मंद झुळूक, जंगलातील शांतता तसेच पाणवठ्यावर प्रत्यक्ष पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन निसर्गप्रेमींना झाले. वाघ पाणवठ्यावर कसा रुबाबाने पाणी पितो, हा क्षण निसर्गप्रेमींसाठी अवस्मरणीय ठरला. 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक़ जयकुमारन, सुमंत सोळंके, दिव्या भारती, किरण जगताप, निमजे, मनोजकुमार खैरनार आदींनी सहभाग घेतला होता. बुद्ध पौर्णिमेला १४० मचाणीहून 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविला गेला. यात २१ वाघांची नोंद झाली असून, बिबट, अस्वल, रानगवा, चितळ आदी वन्यप्राणी निसर्ग प्रेमींना बघता आले. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या अधिकअसल्याचे स्पष्ट होते.- एम. एन. खैरनार, विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :wildlifeवन्यजीव