मेळघाटातील एकाच परिवाराचे चौघे ठार, ११ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश

By गणेश वासनिक | Published: May 6, 2024 01:41 PM2024-05-06T13:41:42+5:302024-05-06T13:43:31+5:30

Amravati : चारचाकीने मागून दिली धडक, वैष्णोदेवीवरून परतताना जालंदर (पंजाब) येथे अपघात

In an accident Four of the same family in Melghat were killed, including an 11-month-old child | मेळघाटातील एकाच परिवाराचे चौघे ठार, ११ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश

In an accident Four of the same family in Melghat were killed, including an 11-month-old child

चिखलदरा (अमरावती): वैष्णोदेवीचे दर्शन करून परत जालंदर येथे मुलाकडे चारचाकीने येणाऱ्या परिवारावर मागून भरधव वेगाने येणाऱ्या चार चाकीने सोमवारी पहाटे ३:३० वाजता जोरदार धडक दिली. या धडकेत वाहन एका रस्त्याकडेवरील झाडावर आदळल्याने एकाच परिवारातील चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यात ११ महिन्याच्या चिमुकलीसह सेवानिवृत्त वडील व शिक्षक मुलाचा समावेश आहे. तर दोघे जखमी झालेत.

गानू रामलाल बेलसरे (६०), लोकेश गानू बेलसरे (३४), अनिशा लोकेश बेलसरे(२४),निहारिका लोकेश बेलसरे ११ महिने सर्व रा. सोलामुह ता चिखलदरा अशी मृतांची नावे असून, शिवराम कासदेकर ५२, सरस्वती शिवराम कासेकर रा नयाखेडा ता अचलपूर अशी जखमींची नावे आहेत. जालंदर येथे असलेल्या बीएसएफमधील मुलाकडे गेले होते. वैष्णोदेवीवरून येत असताना हा अपघात झाला. संबंधित अपघात करणाऱ्या वाहनाला कुठल्याच क्रमांकाची नंबर प्लेट नसून मृतदेह जालंदर येथील रुग्णालयात नेण्यात आल्या असल्याची माहिती बीएसएफ जवान मंगेश बेलसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वृत्तलिहिस्तोवर पोलीस चौकशी करून गुन्हा नोंदवण्याची कारवाई करीत असल्याचे सांगितले

Web Title: In an accident Four of the same family in Melghat were killed, including an 11-month-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.