शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द

By गणेश वासनिक | Updated: December 3, 2024 21:53 IST

दोन डिन पदभरतीची काढली होती जाहिरात, सिनेटमध्ये ठराव घेत आरक्षण पूर्ववत

गणेश वासनिक, अमरावती: आरक्षणावरून राजकीय व सामाजिक क्षेत्रात घमासान सुरु असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सिनेट सभेत उघडकीस आला आहे. विद्यापीठातील दाेन अधिष्ठाता पदभरतीत खुला व ओबीसी संवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना त्याचा केंद्रबिंदू ठरविण्यात आला नसल्याचा आराेप सदस्यांनी पुराव्यांनिशी केला. या मुद्यावरून चांगलेच घमासान झाल्यानंतर विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली पदभरतीची जाहिरात अखेर रद्द केली असून नव्याने पदभरती हाेणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ९ सप्टेंबर २०२४ राेजी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी आरक्षण निर्धारण करून जाहिरात प्रकाशित केली हाेती. परंतु आरक्षण निश्चित करताना विद्याशाखेच्या काेणत्या संवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले ही बाब स्पष्ट करण्यात आली नव्हती. खुला व ओबीसी संवर्गासाठी पदे असल्याचे स्पष्ट असले तरी यामुळे एससी संवर्गावर अन्याय झाल्याचा मुद्दा मंगळवारी विद्यापीठाच्या अधिसभेत उघडकीस आणला. सिनेट सदस्य डाॅ. सुभाष गवई यांनी प्रश्नाेत्तराच्या तासात ‘पाॅईट ऑफ ऑर्डर’द्वारा ही बाब सभागृहापुढे मांडली.

विद्यापीठाने अधिष्ठातापदासाठी अर्ज मागविले आहेत परंतु काेणत्या विद्याशाखेसाठी काेणत्या संवर्गातील उमेदवाराने अर्ज करायचे याची गल्लत झाली आहे. अधिष्ठाता पूर्णवेळ अधिकारी असून त्याजागी शिक्षक कार्य करू शकत नाही. आरक्षणाचा बिंदू केंद्रीत नाही. काेणत्या पदासाठी काेणते आरक्षण ही बाब पुरेशी स्पष्ट नाही. त्यामुळे विज्ञान शाखेतील पारंगत उमेदवाराने नेमका मानव विज्ञान शाखेसाठी अर्ज करायचा का? असा प्रश्न डॉ. सुभाष गवई यांनी केला. उमेदवार संभ्रमित असून अनेकजण आरक्षणात बसत असतानाही त्यांनी अर्ज केले नसल्याची बाब त्यांनी मांडली. यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करून संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करावी, अशी बाजू त्यांनी मांडली. यावेळी डाॅ. संताेष बनसाेड यांनी या संपूर्ण प्रकरणात एससी संवर्गाचे आरक्षण पुढे आले नसल्याचे म्हटले. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याने याप्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी डाॅ. सुभाष गवई यांनी केली.

डाॅ. गवई यांनी यावेळी चार सदस्यीय समिती गठीत करण्याची सूचना केली. पीठासीन सभापती व कुलगुरु डाॅ. मिलिंद बारहाते यांनी शासनाच्या निर्णयांनुसार पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केल्याचे सांगितले. परंतु पदभरती बाबत संभ्रम व सदाेष नसल्याने नव्याने जाहिरात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय याप्रकरणाची चाैकशी करण्यासाठी सिनेट सदस्य डाॅ. प्रवीण रघुवंशी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Amravatiअमरावती