शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या    

By प्रदीप भाकरे | Updated: March 13, 2026 12:27 IST

Amravati Crime News : अमरावती येथील गोपाळ नगरमध्ये मद्यधुंद मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. लाकडी बल्लीने डोक्यावर वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

- प्रदीप भाकरे ​अमरावती: स्थानिक गोपाळ नगर येथील मत्स्यगंधा कॉलनी परिसरात एका मद्यधुंद मुलाने स्वतःच्या वडिलांची बल्लीने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मनोहर मधुकर बोरकर (५५) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा राहुल मनोहर बोरकर (३०) याला तातडीने अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, राहुलला दारूचे व्यसन असून तो नेहमीच वडिलांसोबत वाद घालत असे. गुरुवारी रात्री पिता-पुत्रामध्ये जोरदार भांडण झाले. याच वादातून मद्यधुंद राहुलने घरातील लाकडी बल्लीने वडिलांच्या डोक्यावर आणि शरीरावर वर्मी घाव घातले. मनोहर बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी जेव्हा राहुलचे आजी-आजोबा झोपेतून उठले, तेव्हा त्यांना मनोहर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

​घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट आणि डीबी स्कॉडचे प्रमुख हवालदार मनीष करपे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी राहुलला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व श्याम घुगे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​तीन दिवसांतील दुसरी घटनाअमरावतीत गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा खून आहे. दोन दिवसांपूर्वीच वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे पत्नीने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केली होती. दारूच्या व्यसनामुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची ही भीषण वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Son kills father in drunken rage with wooden stick.

Web Summary : In Amravati, a man killed his father with a wooden stick while intoxicated. Rahul Borkar, the son, was arrested. This follows another recent case of alcohol-related violence in the region, highlighting the devastating impact of addiction on families.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती