शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

योजनांमध्ये सुधारणा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्याद्वारे जिल्हा आढावा : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आधार असतो. त्यामुळे विमा धोरणात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरूड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. वन्यप्राण्यांमुळे  होणाºया अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी विभागातील ४७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात मृद् व जलसंधारणाच्या १०५ योजना पूर्ण होऊन २८ हजार ५९४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात ३,६५३ छतांवरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोत जलसंधारण प्रकारातील २४,४९५ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १६,६७८ कामे पूर्ण झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांद्वारे कामांचे सादरीकरणजिल्ह्यात २०१९ मध्ये खरीपाचे क्षेत्र ६ लाख ८२ हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस ७७८.८४ मिमी होता. अवेळी पावसाने ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ७५ हजार ३९८ आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ९१ हजार २७८ शेतक-यांना ७२ कोटी २६ लाख अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्याला २३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वाटप होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक