शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग

By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2023 17:46 IST

लोणी पोलिसांत गुन्हा

अमरावती : लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यातून ती आठ महिन्यांची गर्भवती राहिली. २६ ऑक्टोबरपूर्वी तो प्रकार घडला. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिसांनी एका २७ वर्षीय आरोपीविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. प्रवीण किशोर खडसे (२७) असे आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन पीडिता ही बलात्कारातून गर्भवती राहिली. दरम्यान, आठ महिन्यांची गर्भवती झाल्याने तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी तिला अमरावती जिल्हा स्त्रीरुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याबाबत गाडगेनगर पोलिसांसह बाल संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्या अल्पवयीन पीडिताचे बयाण नोंदविले.

आरोपी प्रवीण खडसे याने आपल्याला लग्नाचे आमिष दिले. त्याने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे आपणास गर्भधारणा झाल्याचे बयाण तिने दिले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. मात्र, घटनास्थळ लोणी पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने तो गुन्हा लोणीकडे वर्ग करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग