शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:56 IST

Amravati : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, राज्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्त्वावर कार्यरत आदिवासी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, राज्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्त्वावर कार्यरत आदिवासी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भरतीसंदर्भात २८ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत गत १५ वर्षापासून रखडलेल्या पदभरतीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील अनुसूचित क्षेत्रांमध्ये सुमारे २३ हजार पदांची भरती होणार आहे. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुख्य सचिव राजेश कुमार मीना, आदिवासी मतदारसंघातील आमदार, सामान्य प्रशासन विभाग, विधि व न्याय विभाग, आदिवासी विकास विभागाचे सचिव उपस्थित होते. गेल्या १५ वर्षापासून राज्यात अनुसूचित क्षेत्रातील पदभरती रखडली असल्याबाबत 'लोकमत'ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले.

कायमस्वरूपी पद भरती

पेसा भरती प्रक्रियेतील तीन हजार ६९३ उमेदवारांचा निकाल तयार असताना घोषित केलेला नाही. २ हजार ४८८ उमेदवारांचा निकाल घोषित असून, त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. अशा एकूण ६ हजार १८१ नियुक्त्या रखडलेल्या आहेत. पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची १७हजार ३३ पदे रिक्त आहेत. आता ही पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार आहेत.१) संविधानातील पाचवी अनुसूची संविधानाच्या आतील संविधान आहे. राष्ट्रपती यांनी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्राच्या अनुषंगाने राज्यपाल यांनी सहा अधिसूचना काढून पदभरतीचे निर्देश होते.

"२९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेला आणि १ फेब्रुवारी व २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाला बिगर आदिवासींनी कोर्टात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन पेसा भरतीचा अडथळा दूर केला आहे. बऱ्याच वर्षांपासून आदिवासी उमेदवार आपल्या घटनात्मक हक्कापासून वंचित आहे. आतातरी कायमस्वरूपी पदभरती होऊन बेरोजगार आदिवासी उमेदवारांना घटनात्मक न्याय मिळावा."- अॅड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court clears path for 23,000 tribal area job postings.

Web Summary : The Supreme Court's decision unlocks 23,000 permanent positions in scheduled tribal areas. A meeting approved the recruitment, stalled for 15 years, benefiting tribal communities. Vacancies include 17,033 teacher posts. The court removed obstacles related to non-tribal challenges to recruitment rules.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना