लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गुरुवार, २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक रुक्मिणीनगर येथील अहिल्या मंगल कार्यालयात मराठा समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.मराठा आरक्षणाचे लोण आता राज्यभर पसरले आहे. दुसरीकडे राज्य शासन मराठा आरक्षणाच्या मागणीला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने ९ आॅगस्ट रोजी अमरावती बंदची हाक दिली. या बंदमध्ये सकल मराठा समाजाने सहभागी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. २ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनात शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या बैठकीत सकल मराठा समाजातील युवक, युवती, शिक्षक, उद्योजक, वकील, डॉक्टर, शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक यांनी सामाजिक बांधीलकीतून उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे प्रफुल्ल ठाकरे यांनी केले आहे.मराठा शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजलीमराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या वीरांना सकल मराठा समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यात काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, प्रमोद होरे पाटील, अभिजित देशमुख, रोहण तोडकर, नंदू बोरसे, संतोष मानघाले व प्रदीप म्हस्के आदी शहिदांना नमन केले जाणार आहे. यावेळी मराठा समाज आरक्षणासाठी वज्रमुठ बांधणार आहे. आरक्षणासाठी बलिदान वाया जाणार नाही, अशी शपथ देखील घेतली जाणार आहे.सकल मराठा समाजाने उपस्थित राहावेनऊ आॅगस्ट रोजी अमरावती बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वीरीत्या होण्यासाठी सकल मराठा समाजाला एकवटण्यासाठी गुरुवार, २ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या मंथन बैठकीत सकल मराठा समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या बैठकीतून बंदबाबतचे मायक्रोप्लॅनिंग केले जाणार आहे. त्याअनुषंगाने ही बैठक सकल समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:59 IST
सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गुरुवार, २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक रुक्मिणीनगर येथील अहिल्या मंगल कार्यालयात मराठा समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज
ठळक मुद्देशहिदांना श्रद्धांजली : ९ आॅगस्ट रोजी बंदचे नियोजन