शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

अकृषिक जागांना तातडीने परवानगी द्या

By admin | Updated: December 31, 2015 00:11 IST

जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.

पालकमंत्री : रमाई आवास योजना बैठकीत निर्देशअमरावती : जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. अशा प्रकरणात अनावश्यक आक्षेप काढुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अकृषिक जागांना परवानगी देणे, रमाई आवास योजना संदर्भात झालेल्या कामांचा आढावा ना. पोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी शिरसुद्धे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, नगररचना, महानगरपालिका आदी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.ना. पोटे म्हणाले की, शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अकृषिक प्रकरणात कृषिवर आधारित उद्योग उभारणार असून यातून रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी संबंधित विभागांनी अकृषिक वापर सुरु करण्याची तातडीने परवानगी द्यावी. या कामात अडवणूक करणाऱ्या किंवा अनावश्यक आक्षेप काढणाऱ्यांवर सक्तीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.रमाई आवास योजनेंतर्गत झालेल्या घरकुल कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात १,७३९ घरकुले पुर्ण असुन १,१८६ घरकुलांचे काम प्रगतीपथवार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात १,१५६ घरकुलांचे काम पुर्ण असुन १,०६३ कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी २० कोटी रुपये निधीची आवश्यकता लागणार आहे. तसेच ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १,१७८ घरकुलांचे काम पुर्ण झाले असुन ४,३२४ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे चव्हाण यांनी दिली. अनुसुचित जाती, भटक्या जमातीच्या निराधार लोकांना तसेच कमी उत्पन्न गटातील लोकांना येत्या दोन ते तीन वर्षात घरकुले देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. नगरपरिषद प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडे येणारी अकृषिक व घरकुल वाटपाची प्रकरणे सकारात्मकतेने निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.