ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलिसांनी परसोडा पांदण रस्त्यावर नाकाबंदी करून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली. राजेश शिवराम भोकरे(१९, रा. सोनोरा बेलकुंड ता. आठनेर, जिल्हा बैतुल) असे आरोपीचे नाव आहे. १ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा त्याच्या जुन्या दुचाकीवर दोन मोठ्या रबरी ट्युबमध्ये प्रत्येकी ५० लिटर अशी एकूण १०० लिटर गावठी दारू घेऊन जाताना मिळून आला. त्याचेकडून १० हजार रुपयांची दारू व ३० हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली. सदरची कार्यवाही ठाणेदार दीपक वळवी यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका रवींद्र शिंपी, सचिन भुजाडे, राहुल मोरे यांनी केली.
गावठी दारूची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:08 IST