शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

खुल्या जागेवर अवैध रेती साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कन्हान   वाळूची महानगरात मोठ्या प्रमाणात अवैध साठवण केली जात आहे. वहन परवान्यापेक्षा ...

ठळक मुद्देनियमबाह्य उपशातून पर्यावरण धोक्यात, जिल्हाधिकारी देतील का लक्ष?

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कन्हान  वाळूची महानगरात मोठ्या प्रमाणात अवैध साठवण केली जात आहे. वहन परवान्यापेक्षा जास्त वाळूची शेकडो वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे. महानगरात खुल्या जागांवर कन्हान रेती साठवण करून राजरोसपणे व्यवसाय सुरू आहे. यात मोठे ‘अर्थकारण’ असल्याने महसूल विभागाचा छुपा ‘आशीर्वाद’ असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल लक्ष देतील काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.वर्धासह अन्य नदी  पात्रातून रेती उपशाला स्थगिती आहे. त्यामुळे तस्करांनी कन्हान रेती व्यवसायाकडे मोर्चा वळविला. येथील वलगाव मार्गावरील नवसारी रिंगरोड, रहाटगाव टी-पॉईंट, नांदगाव पेठ या मार्गावर कन्हान रेतीची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रकना पोलीस, आराटीओ आणि महसूल विभागाची मूक संमती आहे. कन्हान रेतीचा नागपूर, वर्धा व अमरावती असा नियमबाह्य प्रवास निरंतरपणे सुरू आहे. कन्हान नदीपात्रातून रॉयल्टी चार ब्रास क्षमतेची घ्यायची, मात्र १६ ते २० ब्रास रेती ट्रकमध्ये आणायची, असा हा नियमबाह्य प्रकार सुरू आहे. वर्धा, बेंबळा, पेढी व पूर्णा नदीपात्रातून  चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती आहे. हल्ली कन्हान वाळू माफियांच्या अर्थकारणाचे केंद्र बनले आहे. खुल्या जागांवर रेती गोळा करायची आणि ती बांधकामासाठी विकायची, अशी शक्कल लढविली जात आहे. दोन ब्रास कन्हान रेतीसाठी १४ ते १६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. नवसारी रिंगरोड, बडनेरा येथील जुनीवस्ती, फ्रेजरपुरा, दंत महाविद्यालय मार्ग, महादेवखोरी, वलगाव मार्ग, ॲकेडमिक स्कूलचा परिसर, बडनेरा नजीकचे कोंडेश्वर मार्ग, शासकीय विश्रामगृह समोरील परिसर, रहाटगाव आदी भागात रेती साठवून ठेवली आहे.

वाळू तस्करीचे मोठे रॅकेटखुल्या जागेवर वाळू साठवणे आणि वेळप्रसंगानुसार ती वाहनाद्वारे विक्री करणे हा नवा फंडा वाळू व्यावसायिकांनी सुरू केला आहे. हल्ली शहरात दरदिवशी ४० ते ५० ट्रकद्धारे कन्हान वाळू शहरात आणली जात आहे. ट्रकमधून रेती आणणारे आणि शहरात ती विक्री करणारे असे दोन घटक कार्यरत आहेत. खुल्या जागेवर रेती साठवून ठेवता येत नाही. तरीही हे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 वाळू वाहतूकप्रकरणी संबंधितांकडे रॉयल्टी असेल, तर ते नियमबाह्य मानले जात नाही. मात्र, वहनक्षमतेपेक्षा जास्त रेतीचा वाहतूक हाेत असेल, तर अशा प्रकरणी कारवाई केली जाईल. रेती साठवण स्थळांवर धाडसत्र राबवून रॉयल्टी तपासण्यात येईल.- शैेलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.

टॅग्स :sandवाळू