राजेल मालवीय धारणीबिजुधावडी येथील १८० कोटींच्या गडगा मध्यम प्रकल्पात अभियंता व कंत्राटदारांनी २०० ब्रास चोरीची अवैध रेती साठवणूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने ३७ लाख रूपये दंड ठोठावला होता. त्यामधून प्रथम ६ लाख ५० हजार रुपये दंडाची रक्कम महसूल विभागाने वसूल केला आहे. उर्वरित दंडाची रक्कमही वसूल करणार असल्याने येथील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.कार्यकारी अभियंता अमरावती पाटबंधारे विभागात पूर्ण जिल्ह्यात ७०० कोटी रूपयांची सिंचन प्रकल्पांचे बांधकाम करण्याची मुंबईची नामांकित एफ. ए. कंस्ट्रक्शन कं. ला बिजुधावडी येथील १८० कोटीच्या गडगा मध्यम प्रकल्पात २०० ब्रासपेक्षाही जास्त रेतीसाठा बाळगल्याप्रकरणी येथील महसूल विभागाने ३७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास रेती जप्त करून हर्रास करण्याची सूचनाही दिली. मोठी कार्यवाही होण्याच्या धास्तीने पाटबंधारे विभागाचे अभियंता गांधी व कंत्राटदाराने ३७ लाखाच्या दंडामधून ६ लाख ५० हजार रुपये दंडाचा भरणा महसूल विभागात केल्याने मेळघाटच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ६ लाख दंड वसूल झाल्याची नोंद झाली आहे.गडगा प्रकल्पापासून धारणीची २५ कि.मी. ची शासकीय अधिकृत रेती खदानी सोडून मध्य प्रदेशच्या ५० कि. मी. अंतरावरील तापी नदीपात्रातील मातीमिश्रित चोरीची रेती आणून १८० कोटींच्या सिंचन प्रकल्पात वापरली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. अवैध रेती साठ्याचा पंचनामा करून ३७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, हे विशेष. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ७०० कोटींचे प्रकल्प अपूर्णच ?मुंबईची नामांकित एफ. ए. कंस्ट्रक्शन कंपनीचे अमरावती पाटबंधारे विभागात ७०० कोटींचे सिंचन प्रकल्पावर कामे सुरू आहे. त्यात वासनी खुर्द २०० कोटी, पंढरी प्रकल्प ३०० कोटी, गडगा प्रकल्प १८० कोटी इत्यादी कामे गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहेत. मात्र कामांचा अवधी संपत आला तरीदेखील प्रकल्प अपूर्ण आहे. शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ मिळत नाही. दरवर्षी अंदाजपत्रकात वाढीव किंमत वाढवून शासनाची तिजोरी रिकामी केल्या जात आहे इत्यादीची सर्वंकष चौकशी होणे गरजेचे आहे.अवैध रेती प्रकरणी ३७ लाखाच्या दंडातून एफ. ए. कंस्ट्रक्शन कंपनीने ६ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला व त्यांनी मध्यप्रदेशातील रेती रॉयल्टी पास सादर केल्यात रात्री व दिवसाची रेती वाहतूक असल्याने ते पासेस तपासणीसाठी पाठविल्या ते अहवाल आल्यानंतर उर्वरित दंडाची रक्कम वसूल करणार.- किरण गित्ते,जिल्हाधिकारी, अमरावती. गडगा प्रकल्पात मातीमिश्रित रेतीकोट्यावधीच्या गडगा प्रकल्पात माती मिश्रीत रेती वापरून निकृष्ट बांधकाम होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या गुण दक्षता पथक आर्थिक रकमेपायी पूर्व कामे 'ओके' असल्याचा अहवाल देत आहे. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण होत आहे. ही मातीमिश्रीत रेती मध्यप्रदेशातून आणली होती. कोट्यवधींच्या सिंचनप्रकल्पाच्या कामासाठी मातीमिश्रित रेती वापरून शासकीय महसूल बुडविला जात आहे.
अवैध रेती साठवणूक, साडेसहा लाखांचा दंड वसूल
By admin | Updated: September 14, 2015 00:10 IST