शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पोपटाला खाऊ घालताना व्हिडीओ शेअर कराल तर कोठडीत जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 12:09 IST

वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा होईल दाखल : पाच लाखांपर्यंत दंडाचीही कायद्यात तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन्यजिवांसोबत फोटो, व्हिडीओ, खाऊ घालताना व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करणे हा गुन्हा आहे. असे केल्यास तुम्हाला कोठडीची हवा खावी लागू शकते, इतकेच नव्हे तर पाच लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. वन्यजीव कायदा १९७२ नुसार वन्यजीवांसोबत फोटो काढणे, त्यांना खाऊ घालतानाचे व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर अपलोड करणे, हा गुन्हा असून, असे केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोपटाला खाऊ घालणे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

वन्यजिवाला खाऊ घालू नकावन्यजिवांना खाऊ घालून आपण पुण्याचे काम करतो, असे नव्हे तर आपण त्यांची सवय बिघडवतो. त्यामुळे भविष्यात ते खाण्यासाठी रस्त्यावर येतात. परिणामी, अपघात होतो. त्यांचे नियमित अन्न म्हणजे फळे, पाने, कंदमुळे खाणे सोडून ते आपण दिलेले अन्न खातात. त्यामुळे त्यांची पचनशक्त्ती बिघडते.

वन्यजिवाशी खेळू नका वन्यजीवासोबत खेळणे, त्याला हाताळणे, त्रास देणे, चिडवणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. एखादा पक्षी सापडल्यास वनविभाग कार्यालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. मात्र, अशा वन्यजिवासोबत फोटो, व्हिडीओ शेअर करून त्यांचे प्रदर्शन, वन्यजिवांचा पाठलाग हादेखील गुन्हा आहे.

वन्य प्राण्यांना आपण आपले अन्न खायला देतो, हे पुण्याचे काम नाही तर आपण त्यांचा जीव धोक्यात घालतो, हे आपल्याला समजायला हवे. फोटो काढण्यासाठी वन्यप्राण्यांना त्रास देणे कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. याचे भान ठेवून इतरांना जागरूक करावे व कुठे असे घडत असल्यास वनविभागाशी संपर्क करावा.- नीलेश कंचनपुरे, वन्यजीव संरक्षक, वॉर संघटना

असे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाळा• वन्यजिवांचे प्रदर्शन करणे, त्यांना हाताळत असलेले फोटो, व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करणे हा वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा आहे. • फोटो काढण्यास वन्यजीवाला त्रास देणे हादेखील गुन्हा आहे. त्यामुळे असे फोटो, व्हिडीओ काढल्यास वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग होऊन संबंधित व्यक्ती दंडास पात्र ठरते.• वन्यजीव कायद्यातील तरतुदींचे भान ठेवण्याची गरज आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती