शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ई-केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून होणार नाव कमी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:28 IST

Amravati : ६.७३ लाख लाभार्थ्यांद्वारा अद्याप प्रक्रियाच नाही, २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. या अवधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.

जिल्ह्यातील ३,७४,३३५ रेशनकार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे. यामध्ये बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात. यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे ई-केवायसी करावी लागत आहे. यासाठी दोन वर्षापासून पुरवठा विभागाद्वारा लाभार्थ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे. यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिलेली असताना अद्याप ३२.६५ टक्के लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. मध्यंतरी फक्त १५ दिवस पॉस मशीन बंद होत्या. त्यानंतर नियमितपणे प्रक्रिया सुरू आहे. मात्र रेशन लाभार्थ्यांद्वारा ही प्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

का केली जाते ई-केवायसी?शिधापत्रिक आधार क्रमांकासह संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा अधार क्रमांक अचूक आणि तोच आहे, याची पडताळणी (सत्यापन) या प्रक्रियेद्वारे केली जाते. ओळख व पत्ता यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया महत्त्वाची आहे. 

शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे सत्यापणशिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीचे सत्यापण होणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील. 

३३ टक्के शिधापत्रिकाधारकांनी फिरविली पाठ रेशन दुकानात ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधार कार्ड व शिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरीही लाभार्थ्यांद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे.

महिन्याचे धान्यदेखील मिळणार नाहीप्रधान्य गट लाभार्थी - १५,१२,१३०ई-केवायसी बाकी - ६,७५,३७७अंत्योदय लाभार्थी - ४,७८,५४८प्राधान्य गट कार्ड - ३,७४,३३५अंत्योदय - १,२८,२०७

ई-केवायसी बाकी तालुकानिहाय लाभार्थीअचलपूर ७६,४५६, तहसील ४०,१५३, मोर्शी ३६,३६३, अंजनगाव ३५,७०२, भातकुली २८,७९७, चांदूररेल्वे १७,२२४, चांदूरबाजार ६१,३३०, चिखलदरा ३४,९३८, दर्यापूर ३१,६६४, धामणगाव रेल्वे २८,७३६, धारणी ५९,३९९, नांदगाव खंडेश्वर १८,३३३, तिवसा २८,१५२, वरुड ४२,६४२ व अमरावती एफडीओमध्ये १,३५६,४८३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. 

टॅग्स :Amravatiअमरावती