शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी जादा पैसे घ्याल, तर परवाना कायमस्वरूपी गमवाल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 9, 2023 21:19 IST

महसूल, कृषी विभागाचे निर्देश : क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे नियमित तपासणीची जबाबदारी

अमरावती : पीक विमा योजनेत शेतकरी नोंदणीसाठी एक रुपयापेक्षा जास्त रकमेची आकारणी होत असल्याने, आता महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेद्वारा नियमित तपासणी होणार आहे. तसे आदेश महसूल व कृषी विभागाने अधिनस्त यंत्रणेला दिले आहेत. केंद्र चालकांकडून जादा रकमेची मागणी झाल्यास त्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना सहभागी होता येते. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. शेतकरी हिस्सा आता राज्य शासन भरणा करणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी सामूहिक सेवा केंद्रात जावे लागते. मात्र, यासाठी काही केंद्र चालकांकडून एक रुपयाऐवजी १०० ते २०० रुपयांची आकारणी होत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी अर्जासाठी सीएससी सेंटरला कंपनीद्वारे ४० रुपये मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांची लूट होत असल्याने ‘लोकमत’द्वारा शासनादेशाची प्रत्यक्षात काही केंद्राला भेटी देऊन खातरजमा करण्यात आली व याबाबतचे वृत्त जनदरबारात मांडण्यात आले.

याची गंभीर दखल जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घेतली. याविषयी दोन्ही विभागांच्या क्षेत्रिय यंत्रणेला निर्देशित करण्यात आलेले आहे. यानुसार या अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारा सीएससी केंद्राला भेटी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून जादा शुल्काची आकारणी होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.केंद्राच्या दर्शनी भागात ‘ते’ पत्रक लावापंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपयात शेतकऱ्यांची नोंदणी करून सहभाग घेता येणार असल्याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांचे पत्र प्रत्येक सीएससी केंद्रांच्या दर्शनी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व कृषी विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने आता दोन्ही विभागांचे अधिकारी आता सीएससी केंद्रांची नियमित तपासणी करणार आहेत.क्षेत्रिय कर्मचारी सीएससी केंद्रांची नियमित तपासणी करतील. यामध्ये एक रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास त्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.राहुल सातपुते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी