शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बस बिघडल्यास त्याच तिकिटात करा आता एसी बसने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:44 IST

Nagpur : आता एसटी प्रवाशांना येणार नाही अडचण. सर्व आगारांना दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेकडाऊन वाढले आहे. देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, निम्म दर्जाच्या साहीत्याचा वापर यामुळे हा प्रकार वाढला आहे. अपघातांची संख्याही अधिक आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.

मार्गावर फेल झालेल्या, अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवासी घेण्यास उच्चश्रेणी बसचे चालक-वाहक टाळाटाळ करतात. आता हे चालणार नाही. असे महामंडळाने ठणकावले आहे. फेल झालेल्या साध्या बसच्या प्रवाशांना उच्चश्रेणी बसमध्ये घ्यावे लागेल. असे अलीकडेच एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातून सूचित केले आहे, मार्गावर असलेल्या निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या उच्चश्रेणी बसच्या चालक-वाहकांनी फेल पडलेल्या साध्या बसेसच्या प्रवाशांना घ्यावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. शिवाय साध्या बसच्या तिकीट दरातच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महामंडळाने सर्व विभागांना आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सांगीतले आहे.

महामंडळाच्या बसचे प्रकारअनेक प्रकारच्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात आहेत. त्यात अश्वमेघ, शिवनेरी, शिवशाही, इलेक्ट्रिक यासारख्या एसटी बसेसचा यामध्ये समावेश आहे.

एसटीचा पूर्वीचा नियम ?पूर्वी ज्या श्रेणीची बस आहे, त्याच श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता.

नियमात सुधारणा काय ?आता या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. कनिष्ठ श्रेणीच्या बसमधील प्रवाशांना यापुढे कोणत्याही वरिष्ठ श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येईल.

साधे तिकीट एसी बसमध्येही चालणारनव्या नियमानुसार आता साधी बस मार्गात फेल झाल्यास त्याचे तिकीट एसी बसमध्ये चालणार आहे.

या बसचे तिकीट जास्त महागएसटी महामंडळात आजघडीला अनेक श्रेणीच्या बस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत, त्यात निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या बसचे तिकीट अधिक महाग आहेत.

निर्मनुष्य ठिकाणी व्हायचा जीविताला धोकापूर्वी एखाद्या ठिकाणी बस फेल झाल्यास त्याच श्रेणीच्या बसमध्ये प्रवास करता येत होता. अनेकदा निर्मनुष्य ठिकाणी बस फेल झाल्यास धोका होतो

उच्चश्रेणी बसची व्यवस्थामार्गात साधी बस काही कारणांमुळे बदलावी लागत असेल, उच्चश्रेणी बसची व्यवस्थाही करून द्यावी लागणार आहे.

"परिवहन महामंडयाने काढलेल्या परिपत्रकानुसार नियमानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे."- योगेश ठाकरे विभागीय वाहतुक अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती