शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. याला केंद्र व राज्यातील ...

ठळक मुद्देमूक मोर्चा : बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, केवलराम काळे, संजय खोडके, नरेशचंद्र ठाकरे यांचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच मागण्या ३१ मेपर्यंत सोडविण्यात याव्या, अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते १ जून रोजी आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा मंगळवारी आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदींनी दिला.केंद्रातील शेतकरीविरोधी भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोंडाला आणि हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे महागले आहे. शेतमालाला भाव नाही. कर्जमाफी ही कागदोपत्रीच झाली. तूर विकली, पण शेतकºयांना पैसे मिळाले नाहीत. पीक विम्याचा लाभही नाही. गोदाम उपलब्ध नसल्याचे सांगत तूर व हरभरा खरेदी रखडली आहे. सर्व शेतमाल खरीप हंगामापूर्वी खरेदी करावा व चुकारे त्वरित मिळावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थानिक काँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिला.दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुरीचे चुकारे त्वरित देण्यात येतील, तूर व हरभरा खरेदी पूर्ण केली जाईल, तुरीची उचल करण्यासाठी गोडावून उपलब्ध होतील, बारदाना कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. आंदोलनात जि.प. सभापती बळवंत वानखडे, वनिता पाल, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, श्याम देशमुख, दयाराम काळे, प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, हरिभाऊ मोहोड, प्रमोद दाळू, सुरेश आडे, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, सुरेश साबळे, राहुल येवले, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, गजानन राठोड, प्रदीप देशमुख, रावसाहेब लंगोटे, भैयासाहेब मेटकर, अभिजित देवके, छाया दंडाळे, अलका देशमुख, अनिता मेश्राम, जयश्री तळोकार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.शेतकरी हवालदिल झाला -यशोमती ठाकूरअ.भा. काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. यांना गोदाम उपलब्ध करता आले नाहीत. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा सारेच पैसे मिळत. पण, आता शेतकऱ्यांना घामाचे पैसेही मिळत नाहीत. खरीप जवळ आला असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. फडणवीस सरकारने चार वर्षांत फक्त योजनांची नावे बदलली. सहकार क्षेत्र बर्बाद करण्याचा या सरकारचा अजेंडा आहे.शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक -वीरेंद्र जगतापकेंद्र-राज्यातील मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकºयांची मागील चार वर्षांपासून फसवणूकच केली आहे. शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाची पूर्तता केली नाही. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. शेतमाल पूर्णपणे खरेदी केला नसताना तूर व हरभरा खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. शेतमालाचे चुकारेही दिले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनहितविरोधी व शेतकरीविरोधी या सरकारचे दिवस भरलेत, असे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले.सरकारला जनताच धडा शिकवेल -बबलू देशमुखजिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना तूर, बोंडअळीच्या नुकसानाचे पैसे देण्यात यावेत. नोटबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकासदर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना त्रास झाला. चार वर्षांतच हे सरकार अपयशी ठरले. या विश्वासघातकी सरकारला आता जनताच धडा शिकविणार आहे.