शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

बच्चू कडूंची प्रकृती खालावली तर महाराष्ट्र पेटून उठेल - संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:27 IST

Amravati : गुरुकुंजातून सरकारला इशारा, कृषिमंत्र्यांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : सर्वसामान्यांचे सरकार असे संबोधन महायुतीचे सरकार नेहमी करते. मग बच्चू कडू हे वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत काय? त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत काय? कर्जमाफीच्या आश्वासनावर चर्चा का करीत नाही? बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

कृषी कर्जमाफीसह १७ मुख्य मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष नेते बच्चू कडू यांनी गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे बेमुदत अन्नत्याग उपोषण ८ जूनपासून सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचीही उपस्थिती होती. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, आ. रोहित पवार, खा. अमर काळे, यवतमाळ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगरूळकर यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली.

संभाजीराजे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, कोट घालून फिरणाऱ्या कृषिमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधला होता, असे सांगितले. ही वेळ फोनवरून बोलण्याची नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने लवकरात लवकर हा विषय सोडवला पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे होते. त्यांचा वंशज म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे घराणे उभे आहे, हा संदेश देण्यासाठी मी गुरुकुंजात आलो आहे. महाराष्ट्रातील संयमी, कष्टाळू शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा पंजाबसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होईल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

महत्त्वाच्या नोंदी

  • राजू शेट्टी यांनी १३ जून रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात बंदची हाक दिली आहे.
  • छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलन स्थळाहूनच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट मोबाइलवर संपर्क साधत झापले.
  • बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ झटामझिरी धरणात जलसमाधी आंदोलन, नांदगाव पेठ टोलनाक्यावर 'प्रहार'चे रास्ता रोको, टायर जाळले, डवरगाव येथे अर्धदफन आंदोलन, प्रहारचे धामणगाव बंद, महिलांचे नागपूर हायवेवर मोझरी जवळ रास्ता रोको आंदोलन.
  • पालकमंत्री बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मौदा तहसील कार्यालयाचे कामकाज प्रहारने बंद पाडले. प्रवेशद्वारावरच ठिय्या.
टॅग्स :AmravatiअमरावतीBachhu Kaduबच्चू कडूSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती