शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मला व्हायचं होतं आर्किटेक्ट पण दादांमुळे झालो वकील - न्या. गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:09 IST

Amravati : अमरावती येथे वकील संघाच्या वतीने हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावतीःमला वकील व्हायचे नव्हते, व्हायचे होते आर्किटेक्ट परंतु दादासाहेब गवई माझे वडील यांची इच्छा होती की मी वकील व्हावं, ती मी पूर्ण केली. माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कुणाचा असेल तर तो दादांचा. लहानपणापासून त्यांच्यासोबत वावरण्याची संधी मिळाली. त्यामुळे समाजाबद्दल आपली काय संवेदना असावी, हे जवळून बघता आले. त्याची जळणघडणच त्यांच्या सानिध्यात झाली. खरं तर दादांना वडील व्हायचे होते, परंतु त्यांची लॉची परीक्षा असताना ते सत्याग्रहात कारागृहात होते आणि त्यानंतर राजकारणात पूर्णवेळ सेवा देत असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं. त्यांचा आदेश मी पूर्ण केला आणि मी वकील झालो. पुढे न्यायाधीश झालो, अशी प्रांजळ कबुली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी दिली. 

संघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, जनतेच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्यायपालिकांवर आली आहे. समता, स्वातंत्र, न्याय, बंधुत्वाला बाधा पोहोचणार नाही, याची न्यायनिर्वाळा देताना काळजी घेतली. सामाजिक, आर्थिक समस्येवर तोडगा काढताना काही प्रकरणात राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर केला. कोण काय म्हणेल त्यापेक्षा समाजाला काय हवे? याची जाणीव ठेवून काही प्रकरणे हाताळल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कठोरा मार्गालगतच्या पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या ह्दयस्पर्शी सत्कार सोहळ्याप्रसंगी मंचावर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, डॉ. कमलताई गवई, डॉ. तेजस्विनी गवई यांची विशेष उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा हे उपस्थित होते. तर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. पारिजात पांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शाल श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

देशाचे संविधान हेच 'सुप्रीम'विधिमंडळ (कायदेमंडळ), कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे ही चार स्तंभ असले तरी देशाचे संविधान हेच 'सुप्रीम" असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अधोरेखित केले. कारण न्यायदान हे जॉब नाही तर ते सतीचे वान आहे. न्यायाधीशांना राज्यघटनेला आधारीत न्यायनिर्वाळा द्यावा लागतो. वकिलांना सुद्धा प्रचंड श्रम, मेहनत करावी लागते, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Amravatiअमरावती