शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे म्हणाले, माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते पण...

By उज्वल भालेकर | Updated: July 10, 2023 13:52 IST

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत

अमरावती : माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्नच नव्हते. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता. आजही माझा तोच निर्धार आहे. तसे वचन मी माझ्या जन्मदात्याला म्हणजेच हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दिला होते. यासंदर्भात अमित शहा यांच्याशीही तसेच बोलणे झाले होते. आणि त्यांनी ते मान्यही केले होते. परंतु त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे मी अनपेक्षित पणे मुख्यमंत्री झाल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावतीमध्येही आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परंतु यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, हा दौरा सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आहे. मातोश्रीवर सर्व कार्यकर्त्यांना भेटणे शक्य नसल्याने मीच त्यांच्या भेटीसाठी आल्याचे ते म्हणाले.

"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही, तुम्ही घरफोडे आहात"

ठाकरे यांच्या अमरावती आगमनामूळे शहरात भावी प्रधानमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत, त्यामुळे ते प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते मी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. माझा निर्धार हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा आहे. जर माझी मुख्यमंत्री पदाचीच इच्छा नव्हती तर प्रधानमंत्री विचार नाहीच. परंतु जर मी प्रधानमंत्री झालोच तरी काय फरक पडणार आहे. आणीबाणी नंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी दिली होती. म्हणूनच जनता पक्ष सत्तेत आला होता. पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत सारखे ज्येष्ठ साहित्यिक मैदानात उतरले होते. त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. परंतु आता ही मुभा देखील आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ