शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

राजमाता जिजाऊंचा अंबानगरीत जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:11 IST

आरटीओ चौकातील राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या पुतळ्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती विचारमंच, जिजाऊ बँक, संगीतसूर्य केशवराव भोसले कला क्रीडा व सांस्कृतिक कक्ष, युवा स्वाभिमानी पार्टी, शहर काँग्रेस, व इतर अनेक पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने हारार्पण करून मानवंदना’ देण्यात आली.

ठळक मुद्देमानवंदना : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती विचार मंच, युवा स्वाभिमानचा सहभाग, शहरात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओ चौकातील राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या पुतळ्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती विचारमंच, जिजाऊ बँक, संगीतसूर्य केशवराव भोसले कला क्रीडा व सांस्कृतिक कक्ष, युवा स्वाभिमानी पार्टी, शहर काँग्रेस, व इतर अनेक पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने हारार्पण करून मानवंदना’ देण्यात आली.शनिवारी सकाळी ८.३० वाजता विविध संघटनांद्वारा मां जिजाऊंचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त संजय निपाणे, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, ज्योती इंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वैद्य, विधीज्ञ विजय कोठाळे, विलास राऊत, शरद बोकसे, वर्षा धाबे, कांचन उल्हे, शोेभना देशमुख, सीमा राहाटे, तेजस्विनी वानखडे, माया गावंडे, मीनाक्षी जाधव, सुशीला देशमुख, पद्मा महल्ले, कुसूम रोडे, रणजित तिडके, प्रतिभा रोडे, वनिता कोठाळे भोजराज चौधरी, नानासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती.युवा स्वाभिमान पार्टीची भव्य रॅलीआमदार रवि राणा व नवनीत राणा यांच्या नेतृत्वात राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या पुतळ्याला हार्रापण करून मानवंदना देण्यात आली. ‘जय जिजाऊ’, ‘जय शिवराय’ अशा घोषणा रॅली पंचवटी चौकातून पुढे निघाली. डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला हारार्पण करून गाडगेबाबा समाधी मंदिरात हारार्पणानंतर शेगाव नाका मार्गे, ईर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. जोग चौकातील स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळयाला हारार्पण करण्यात आले. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. यानंतर राजकमल चौक व नंतर सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनीत रॅलीचा समारोप झाला. महिलांनी बांधलेले भगवे फेटे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी विनोद जायलवाल, नितीन बोरेकर, अनूप अग्रवाल, कोमल मानापुरे, नगरसेविकाक सुमती ढोके, शालिनी देवरे, नीलेश भेंडे, अभिजित देशमुख, नाना सावरकर, नगरसेवक आशिष गावंडे, विनोद गुहे, प्रवीण सावळे, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, मंगेश कोकाटे, सचिन सोनोने, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, जीवन सदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमजिजाऊ बिग्रेडच्यावतीने रविवारी सायंकाळी ४ वाजता आरटीओ चौकातील जिजाऊ पुतळ्या जवळ सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलतासे, स्मृतीगिते व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती जिजाऊ बिग्रेडच्या राष्ट्रीय ज्येष्ठ मार्गदर्शक मयुरा देशमुख यांनी दिली.राष्टÑमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था व सहकारी संस्थांमध्ये शाळा-महाविद्यालयात साजरी करण्यात आली. या दिननिमित्याने अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमाद्वारे राष्टÑमाता जिजाऊंना मानवंदना देण्यात आली.जिजाऊ बँकेत जिजाऊ जयंतीयेथील खत्री कॉम्पलेक्स स्थित जिजाऊ बँकेत राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्तांनी मां जिजाऊंच्या प्रतिमेला हारार्पण करून मानवंदना दिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.छत्रपती विचार मंचची रॅलीछत्रपती विचार मंचाच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त साधून शहरातून भव्य रॅली काढली. आरटीओ चौकातील जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्याला हार्रापण व मानवंदना देण्यात आली. यामध्ये शेकडो युवक - युवती सहभागी झाल्या. अनेकांनी जिजाऊ व शिवरायांच्या वेशभूषा साकारल्या. रॅली मालटेकडी, मोतीनगर, फरशीस्टॉप, गोपालनगर, राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, इर्विन, पंचवटी, आरटीओ चौकातून मार्गक्रमण केले. 'जय जिजाऊ व जय शिवराय' आदी घोषणांनी शहर दुमदुमले. पंचवटी चौकात युवा स्वाभिमान पार्टी व छत्रपती विचारमंचाच्या कार्यकर्त्यांची रॅली एकत्र आली. यावेळी सुमीत देशमुख, जयपाल उत्तमाने, सनी रबळे, कृष्णा चेतुर्वेदी, प्रसाद पिदडी, राहुल देशमुख, गौरव गतफने, स्वराज देशमुख, हर्षल ठाकरे, राहुल इंगोले, अंकित देशमुख, आशुतोष पानसरे, सागर देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रत्येक मुलींनी जिजाऊ व्हावे, असे घोषवाक्य छत्रपती विचार मंचाच्यावतीने देण्यात आले होते.शहर काँग्रेसतर्फे मानवंदनाशहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिजाऊ मां साहेबांच्या पुतळ्याला हारार्पण व मानवंदना दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, प्रल्हाद ठाकरे, डॉ.बी.आर देशमुख, महिला प्रदेश सरचिटणीस कांचनमाला गावंडे, सलीम मिरावाले, पुरुषोत्तम मुदंडा, भैया निचळ, दीपकसिंह सलुजा, योगेश सोळंके, सुरेंद्र देशमुख, राजू कोंडे उपस्थित होते.