शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

शेजारच्या विवाहितेस पळवून नेणाऱ्या पतीला पत्नी-मेहुण्याने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

आंधळ्या प्रेमातून एका विवाहित व्यक्तीने चक्क शेजारी राहणाऱ्या विवाहितेलाच पळवून नेले. दोन्ही कुटुंबांपुढे प्रश्न उपस्थित करणाऱ्या या ‘लव्ह स्टोरी’चा पुढचा अंक सोमवारी पाहायला मिळाला. विवाहित प्रियकर व पे्रयसी महिला मुलांना भेटण्याच्या ओढीने सोमवारी शाळेत आले असता, प्रियकराची पत्नी व मेहुण्यासह नातेवाइकांनी त्याला बदडून काढले.

ठळक मुद्देमोतीनगरातील शाळेच्या आवारातील घटना : दोन्ही कुटुंबीय फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचल्याने उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आंधळ्या प्रेमातून एका विवाहित व्यक्तीने चक्क शेजारी राहणाऱ्या विवाहितेलाच पळवून नेले. दोन्ही कुटुंबांपुढे प्रश्न उपस्थित करणाऱ्या या ‘लव्ह स्टोरी’चा पुढचा अंक सोमवारी पाहायला मिळाला. विवाहित प्रियकर व पे्रयसी महिला मुलांना भेटण्याच्या ओढीने सोमवारी शाळेत आले असता, प्रियकराची पत्नी व मेहुण्यासह नातेवाइकांनी त्याला बदडून काढले. हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही कुटुंबीय तेथे पोहोचल्याने प्रचंड गोंधळ उडाला. आता हे प्रकरण कसे सावरावे, दोघांची कशी समजूत घालावी, याचा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून विवाहित प्रियकर व प्रेयसीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.मुदलीयानगर येथील रहिवासी सतीश चिंचोळकर (३९,रा. मुदलीयारनगर) एका पानटपरीवर काम करतो. त्याला दोन मुले आहेत. त्याने दीड महिन्यांपूर्वी शेजारी राहणाºया एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्या विवाहितेलासुद्धा पतीपासून दोन मुली आहेत. त्या महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने सतीश व तिचे प्रेम चांगलेच बहरले. आधीच विवाहबद्ध असलेल्या या जोडप्याने स्वत:च्या मुलांचा विचार न करता पलायन केले. हा प्रकार परिसरात वाºयासारखा पसरला. त्यावेळी सतीशची पत्नी व सदर महिलेच्या पतीने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून आपआपली तक्रार नोंदविली होती. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.दरम्यान, पोलीस चौकशीत पळालेल्या जोडप्याने विवाह केल्याचे आणि ते औरंगाबादला असल्याचे समजले. महिना उलटून गेल्यानंतर ते दोघेही मुलांना भेटण्यासाठी सोमवारी अमरावतीत आले. दुपारच्या सुमारास मुदलीयारनगरातील मुलांच्या शाळेत गेले. तेथे जावई सतीश हा मेहुण्याला दिसला. त्याने जावयाशी वाद घालून चोप देण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. ही बाब सतीशच्या पत्नीसह त्या विवाहितेच्या कुटुंबीयांनीही कळली. तेसुद्धा शाळेत पोहोचले. सर्वांनी सतीशला चोप देत फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी सतीश व त्याच्या मेहुण्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. सतीशची पत्नी व महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.अन् दोन्ही कुटुंबीय पडले पेचातफ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नगरसेवक बंडू हिवसे व माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह काही नागरिकांनी पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्याशी या प्रकरणाविषयी चर्चा केली. ठाणेदार मेश्राम यांच्या कक्षात सतीश व पळून गेलेल्या विवाहितेला बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सतीश व त्या महिलेने दोन्ही कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त केल्याची ओरड नागरिकांनी केली. त्यावेळी त्या विवाहितेला रडायला लागली. मेश्राम यांनी दोघांनाही समजविण्याचे प्रयत्न केले. मात्र, महिलेने सतीशसोबत राहण्याची इच्छा दर्शविली. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.तीन वर्षीय मुलीची मोठ्या आईसोबत राहण्याची इच्छासतीशने पळवून नेलेल्या विवाहितेला तीन व पाच वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. पळून जाताना ती लहान मुलीला सोबत घेऊन गेली होती. सोमवारी ते अमरावतीत परतल्यानंतर हा किस्सा घडला. दोन्ही कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रत्येकाने सतीश व त्या महिलेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेमात पडलेला त्या महिलेने सतीशसोबत राहण्याची इच्छा दर्शविली. त्यामुळे त्या महिलेच्या मुलींचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तिच्या ३ वर्षीय मुलीला नातेवाईक व पोलिसांनी विचारणा केली असता, तिने मोठ्या आईसोबत राहण्याची इच्छा दर्शविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी