शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पत्नीचा विनयभंय करून पतीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:13 IST

--------- फारकतीसाठी पत्नीला काठीने मारहाण अमरावती : फारकतीसाठी मद्यपी पतीने पत्नीला काठीने मारहाण केली. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या ...

---------

फारकतीसाठी पत्नीला काठीने मारहाण

अमरावती : फारकतीसाठी मद्यपी पतीने पत्नीला काठीने मारहाण केली. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी येथे ११ एप्रिल रोजी घडली. पीडित महिलेला मुलगा होत नसल्याने पती सुमित भोसले (४०) याने त्यांना दुसरे लग्न करण्यासाठी फारकती मागितली. मात्र, महिलेने फारकती देण्यास नकार दिला. त्यामुळे सुमितने पत्नीला काठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी महिलेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

--------

तरुणीचा विनयभंग करून धमकी

अमरावती : एका तरुणीचा विनयभंग करून धमकी देण्यात आली. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. पीडित तरुणी लहान भावाचा वाढदिवस असल्याने दुचाकीने केक आणायला जात होती. मार्गात अभिजित मोहन पानेकर (२१) याने दुचाकी आडवी करून तिला अडविले. तिच्या दुचाकीची चावी काढून माझ्या संग चल, असा आग्रह धरला. अन्यथा तुझी बदनामी करेल, अशी धमकीही त्याने दिली. त्याचवेळी एका नागरिकाने त्याला हटकले. त्यामुळे अभिजित तेथून निघून गेला. सदर घटनेनंतर पीडितेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

----------------

गंगोत्रीनगरात घर फोडले

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगोत्रीनगर येथील रहिवासी नागरिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. गंगोत्रीनगर येथील रहिवासी सुरेशसिंह मनजितसिंह बग्गा (४४) यांचे घर फोडून चोरट्यांनी ३५ हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही बाब लक्षात आल्यावर सुरेशसिंह बग्गा यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

-------------

अल्पवयीन तरुणीला पळविले

अमरावती : एका अल्पवयीन तरुणीला पळविले. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा १९ वर्षीय तरुण कामावरून घरी परतल्यावर त्याला लहान बहीण घरी दिसून आली नाही. त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. तिला कुणीतरी अज्ञाताने पळविल्याचा संशय आल्याने भावाने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

--------------

महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ

अमरावती : एका महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ करण्यात आली. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ एप्रिल रोेजी घडली. पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी सचिन मदनलाल श्रीवास (४२) रा. मोतीनगर हा त्यांच्याकडे आला. मला लोनसंदर्भात बँकेत चेक टाकायचा आहे, असे म्हणून त्याने महिलेकडे चेक मागितले. महिलेने नकार दिल्यावर सचिनने त्यांचा विनयभंग करून चेक हिसकावून घेतला. महिलेने आरडाओरड केल्यावर सचिनने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. याप्रकरणी पीडितेने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.

---------------

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधी आश्रम येथे १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. प्रणय सुनील जाधव (१८) रा. गांधी आश्रम असे मृताचे नाव आहे. प्रणयने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब त्याच्या काकाच्या लक्षात आल्यावर खोलापुरी गेट पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. प्रणयच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.