शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्काला किती मिळाले टार्गेट किती कोटी झाले प्राप्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:27 IST

Amravati : ६५ हजार दस्तांची दहा महिन्यांत नोंदणी

अमरावती : मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास २०२४-२५ करिता ४५० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते. सद्यस्थितीत ३३६ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झालेला आहे. या अवधीत ६५,१४० दस्तनोंदणी झालेली आहे. एक एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात १० टक्के वाढ होणार असल्याने सध्या या कार्यालयात दस्तनोंदणीची गर्दी होत असल्याने कार्यालयाचा अवधी दोन तासांनी वाढविला आहे. त्यामुळे यंदा उच्चांकी महसूल मिळण्याची शक्यता आहे.

६५ हजार दस्तांची दहा महिन्यांत नोंदणीजिल्ह्यात आतापर्यंत म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील १६ कार्यालयात १६,१४० दस्तनोंदणी झाली. याद्वारे ३३६ कोटींचा महसूल या विभागास प्राप्त झाला आहे. शहरातील दोन कार्यालये सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहतात, तर सर्वच कार्यालये मार्चअखेरपर्यंत रात्री ८.१५ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत.

१ एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढणारशासनाने कोरोना काळापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही व यंदा १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व १६ ही कार्यालयात गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीत तिष्ठत राहावे लागू नये, यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यालयांचा अवधी दोन तासांनी वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

उद्दिष्ट कितीचे?मुद्रांक शुल्क विभागाला सन २०२४-२५ या कालावधीत ४५० कोटींच्या महसुलाचे टार्गेट आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ३३६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ही ७४.६६ टक्केवारी आहे. मार्च महिन्यात दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असल्याने टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे या विभागाने सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी-कर्मचारी एकदिलाने परिश्रम घेत आहेत.

"जिल्ह्यास असलेल्या टार्गेटच्या तुलनेत प्राप्त महसुलाची स्थिती दिलासाजनक आहे. मार्च महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचारी दोन तास जास्त सेवा देत आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्वी निश्चित होईल."- अनिल औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती